डब्लिन | भारतीय संघाचा स्टार खेळाडू सुरेश रैनाला आज टी२०मध्ये ३०० षटकार पुर्ण करण्याची संधी आहे. त्याने सर्व प्रकारच्या टी२० सामन्यांत मिळुन २९५ षटकार खेचले आहे.
रैना आजपर्यंत २९१ टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७८२३ धावा करताना ७०० चौकार आणि २९५ षटकार खेचले आहे.
टी२० मध्ये आजपर्यंत केवळ ७ खेळाडूंनी ३०० षटकार मारले आहेत. त्यात रोहित शर्मा हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. रोहितने २८४ सामन्यात ३०२ षटकार खेचले आहे.
या यादीत अव्वल स्थानी ख्रिस गेल असून त्याने ३३५ सामन्यात ८४६ षटकार मारले आहेत. जगात अन्य कोणत्याही खेळाडूला ५२८ पेक्षा जास्त षटाकार टी२० सामन्यांत मारता आलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
–रहाणेला वनडेत का संधी दिली नाही? मुंबईकर दिग्गजाचे निवड समितीवर ताशेरे
–सेहवाग म्हणतो, या खेळाडूला ११ खेळाडूंमध्ये स्थान देऊ नका
-युजवेंद्र चहलने २०१९ विश्वचषकाबद्दल केले मोठे वक्तव्य
–…तर भारत-पाकिस्तान जागतिक क्रिकेटवर राज्य करु शकतात!
-पुढील १३ दिवसांत ४ संघाना टी२०मध्ये नंबर १ होण्याची संधी
–Video- कोर्टवरील हस्तमैथुनाचे हावभाव पडले महागात, टेनिसपटूला १३ लाखांचा दंड
-वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात