क्रिकेट वेडा समजला जाणाऱ्या भारत देशात, राष्ट्रीय संघात आपली जगा बनवण्यासाठी भयंकर स्पर्धा चालु असते. ह्याच खडतर वाटेवर अनेक क्रिकेटपटूंना निराशेचा सामना करावा लागतो. एकीकडे भारतीय संघातील काही खेळाडूंची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली आहे, तर दुसरीकडे असे काही क्रिकेटपटू आले असे आले ज्यांची कामगिरी फारशी विशेष नाही. भारतीय संघात चांगली कामगिरी न करताही काही खेळाडूंना संघात स्थान मिळालं, तर उत्तम कामगिरी करूनही अनेक खेळाडू संघाबाहेर राहिले.
यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा दोष नाही किंवा संघ व्यवस्थापनाचा दोष नाही. यासाठी परिस्थिती तशी असावे लागते. काहीवेळेस संघात जागा नसल्याने काही खेळाडूंना अधिक संधी मिळाली नाही. अशाच मागील दशकातील ५ प्रतिभावान क्रिकेटपटूंचा या लेखात आढावा घेतला आहे, ज्यांना भारतीय संघात सातत्याने संधी मिळाली नाही.
५. करुण नायर
भारताचा मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरने २०१६ मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात तिहेरी शतकी खेळी केली होती, परंतु त्यानंतर त्याने केवळ तीन कसोटी सामने खेळले आहेत. नंतर दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणे संघात परतल्याने आणि पाच गोलंदाज खेळवण्याचा भारताच्या इच्छेमुळे नायरला कसोटीमधून वगळलं.
परंतु कसोटीत तिहेरी शतक करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू होता. तो म्हणाला, “मी ऑस्ट्रेलिया मलिकात बाहुदा ४ डाव खेळलो असेल, कुठल्याही फलंदाजास सुरुवातीला दोन डावांत यश तर, दोन डावांत अपयश येऊ शकते. पण त्यानंतर संघातून बाहेर करणे आणि त्यानंतर कधी संधी न मिळणे ही दुर्दैवी बाब आहे,” असे २८ वर्षीय नायरने सांगितले.
नायरने ६ कसोटी सामने आणि २ वनडे सामने भारताकडून खेळले. कसोटीत त्याने एका त्रिशतकासह ३७४ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वनडेत त्याने ४६ धावा केल्या आहेत. सध्या नायर कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
४. मनोज तिवारी
२०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात मनोज तिवारीने शतक झळकावले आणि सामनावीर पुरस्कारही जिंकला. परंतु या मधल्या फळीतील फलंदाजाला भारताच्या पुढच्या अनेक वनडे सामन्यांसाठी भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. २०१२ मध्ये त्याने पुनरागमन केले होते आणि चेंडू हातात घेऊन त्याने ४ बळीही घेतले असले तरी २०१५ पासून तिवारी भारताकडून खेळताना दिसला नाही.
३४ वर्षीय तिवारीला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या लिलावातही दुर्लक्षित केले गेले. याबद्दल त्यानेही नाराजी व्यक्त केली. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि राइझिंग पुणे सुपरगियंटसाठी तिवारीची सातत्यपूर्ण कामगिरी करून सुद्धा तो भारतीय संघात दिसला नाही.
मनोजने १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत यातील १२ वनडे सामन्यात त्याने १ शतक आणि १ अर्धशतकासह त्याने २८७ धावा केल्या तर ३ टी२० सामन्यात १५ धावा केल्या आहेत.
३. रॉबिन उथप्पा
वादग्रस्त ग्रेग चॅपेलच्या नेतृत्वात भारतीय संघात पदार्पण केल्यानंतर उथप्पा २००७ टी-२० विश्वचषक आणि २००७ मधील वनडे विश्वचषकात खेळला. परंतु त्यानंतर मात्र, त्याची अफाट क्षमता आणि सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी असूनही तो देशासाठी नियमित खेळताना दिसला नाही. तो देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळत राहिला मात्र त्याला भारतीय संघाकडून जास्त संधी मिळाली नाही.
तो आपल्या कारकिर्दीत एकूण ४६ एकदिवसीय सामने आणि १३ टी-२० सामने खेळाला.
२. पार्थिव पटेल
पार्थिव पटेलने १७ व्या वर्षी एमएस धोनी आणि दिनेश कार्तिकच्या पदार्पणाच्या आधी भारतीय संघात पदार्पण केले. परंतु काही अपयशानंतर निवड समितीने त्याच्या जागी एमएस धोनीला संघात स्थान दिल्यानंतर तो संघातून बाहेर फेकला गेला. त्यानंतर तो देशांतर्गत स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत होता. त्याने २०१६-१७ च्या रणजी करंडक स्पर्धेत गुजरातचे नेतृत्व केले. ऐतिहासिक सामन्यात चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना त्याने १३३ धावा केल्या.
नंतर वृद्धिमान साहाला दुखापत झाल्यानंतर पार्थिवला इंग्लंडमधील कसोटी सामन्यात बोलावले गेले होते आणि त्याने त्या सामन्यात अर्धशतक झळकावले. परंतु तो पुन्हा बाजूला फेकला गेला.
स्वत: पार्थिवने म्हटले आहे की, “एमएस धोनीच्या काळात त्याचा जन्म होणे ही दुर्दैवी बाब नाही, माझी कारकिर्द त्याच्याआधी सुरु झाली होती. मला त्याच्याआधी चांगली कामगिरी करण्याची संधी होती. धोनी संघात आला कारण मी काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी करु शकलो नाही आणि मला वगळण्यात आले.”
१. पंकज सिंग
२०१४ मध्ये भारताच्या इंग्लंड दौर्यामध्ये विराट कोहलीच्या संघात पंकज सिंगला जखमी इशांत शर्माच्या जागी संधी देण्यात आली होती. ही संधी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कष्टाचे फळ म्हणून मिळाली. पण तो भारतीय संघात जास्त काळ टिकला नाही.
राजस्थानच्या या वेगवान गोलंदाज पदार्पणात एकही विकेट घेऊ शकला नाही आणि परंतु निवड समितीने आणखी एक सामना खेळण्याची संधी दिली.
२०१८ मध्ये रणजी चषकातील जलद ४०० विकेट मिळविणारा पंकज सिंग पहिला खेळाडू ठरला आणि त्याने कर्नाटकच्या विनय कुमारची बरोबरी साधली. प्रथम श्रेणीत चांगली कामगिरी करूनही तो भारतीय संघात आपले स्थान टिकावू रहाल नाही ही एक दुर्दैवी बाब आहे.