---Advertisement---

जर शतक केलं तर विराट कोहली मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम

On: सोमवार, जानेवारी 15, 2018 1:39 PM
---Advertisement---

सेंच्युरियन । भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जेव्हा संकटात सापडला होता तेव्हा कर्णधार विराट कोहली स्वतः पुढे येऊन चांगली फलंदाजी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात मदत केली. विराट सध्या ८५ धावांवर नाबाद खेळत आहे.

जर विराटने आज शतकी खेळी केली तर दक्षिण आफ्रिकेत कसोटीत शतकी खेळी करणारा तो केवळ दुसरा भारतीय कर्णधार बनणार आहे. यापूर्वी १९९७मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १६९ धावांची खेळी केली होती.

२०१०मध्ये एमएस धोनी(९०) आणि १९९२मध्ये मोहम्मद अझरुद्दीन(६०)ला कर्णधार म्हणून शतकी खेळी करण्यात अपयश आले होते. विराटचा सध्याचा फॉर्म पाहता तो शतकी खेळी करेल असे वाटतेय.

दक्षिण आफ्रिकेत भारतीय कसोटी कर्णधाराने केलेल्या सर्वोच्च खेळी
१६९ सचिन तेंडुलकर १९९७
९० एमएस धोनी २०१०
८५* विराट कोहली २०१८
६० मोहम्मद अझरुद्दीन १९९२

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment