तमिळनाडूचा फलंदाज नारायन जगदीसन अर्थातच एन जगदीसन याची बॅट सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या हंगामामध्ये चांगलीच तळपत आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये जगदीसनने एक किंवा दोन नाहीतर लागोपाठ 5 शतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत कोणीही एका हंगामात 4 पेक्षा अधिक शतके केली नाहीत, मात्र तमिळनाडूच्या या फलंदाजाने अशी कामगिरी करत विराट कोहली याचा विक्रम मोडला आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने 2008-09च्या हंगामात चार शतके करण्याची कामगिरी पहिल्यांदा केली होती. आता नारायन जगदीसन (Narayan Jagadeesan)याने लागोपाठ 5 शतके ठोकत विराटचा हा विक्रम मोडला. एवढेच नाही तर एकाच हंगामात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे.
विराटचा विक्रम मोडताना जगदीसन जगातील एकमेव असा खेळाडू ठरला ज्याने पाच लिस्ट ए डावांमध्ये शतकी खेळी केली. त्याच्याआधी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा (Kumar Sangakkara), दक्षिण आफ्रिकेचा एल्विरो पीटरसन आणि भारताचाच देवदत्त पडीकल यांनी लिस्ट ए क्रिकेटमध्ये लागोपाठ चार-चार शतकी खेळी केल्या होत्या. यातील संगकारा हा एकमेव असा फलंदाज आहे ज्याने ही कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली होती.
विकेटकीपर-फलंदाज जगदीसनने विजय हजारे ट्रॉफीच्या या हंगामात आंध्र प्रदेश विरुद्ध नाबाद 114, छत्तीसगड विरुद्ध 107, गोवाविरुद्ध 168 आणि हरियाणाविरुद्ध 128 धावा केल्या होत्या. तर आता अरूणाचल प्रदेश विरुद्ध 141 चेंडूत 277 धावांची खेळी केली.
याबरोबरच जगदीसनने या स्पर्धेच्या 6 डावांमध्ये 159च्या सरासरीने 799 धावा केल्या आहेत. अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या द्विशतकी खेळीत त्याने 25 चौकार आणि 15 षटकार खेचले. या सामन्यात त्याने 196.45च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. त्याचबरोबर साई सुदर्शन याने 102 चेंडूत 154 धावा केल्या. या दोन्ही स्फोटक सलामी खेळींमुळे तमिळनाडूने 50 षटकात 2 विकेट्स गमावत 506 धावसंख्या उभारली.
जगदीसन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू होता, मात्र नुकतेच त्याला फ्रॅंचायजीने मुक्त केले आहे. आता डिसेंबर महिन्यात 2023साठी होणाऱ्या लिलावात त्याला किती रक्कम मिळणार याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. N Jagadeesan’s World Record in ODI Cricket, score back to back 5 centuries In Vijay Hazare Trophy 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या सामन्यातच फुटबॉल विश्वचषकाचा 92 वर्ष जुना विक्रम मोडीत, कतारवर इक्वेडोर पडले भारी
VIDEO: चहल, सिराज आणि शार्दुलचा ‘सँडविच ब्रोमान्स’! ड्रेसिंग रुमचा व्हिडिओ व्हायरल