पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये दुहेरीत भारताच्या एन. श्रीराम बालाजी व जीवन नेदुंचेझियनच्या साथीत अमेरिकेच्या दुसऱ्या मानांकित नॅथॅनियल लेमन्स व जॅक्सन विथ्रो यांचा टायब्रेकमध्ये 7-6(6),7-6(5) असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
बालाजी व जीवन या जोडीला बदली खेळाडू म्हणून या स्पर्धेत प्रवेश मिळाला होता. या जोडीने लेमन्स व जॅक्सन विथ्रो यांच्याविरुद्ध सुरेख कामगिरी बजावत दोन्ही सेट टायब्रेकमध्ये जिंकून विजय मिळवला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदिच्छा भेट दिली. फडणवीस म्हणाले कि, टाटा ओपन स्पर्धेचे हे पाचवे पर्व असून गेली चार वर्षे या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले गेले आहे. दक्षिण आशियातील एकमेव एटीपी २५० मालिकेतील स्पर्धा असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे यापुढेही आयोजन करण्यात राज्य शासनाचा पाठिंबा राहिल व हि स्पर्धा आम्ही राज्याबाहेर जाऊ देणार नाही असे सांगून पुढील पाच वर्षे राज्य शासनाचा आर्थिक पाठिंबा लाभेल याचे सूतोवाच केले.
यावेळी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, आयएएस विक्रम कुमार, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, राज्य टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर, टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रविण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनच्या ज्युलियन कॅश व हेन्री पॅटन यांनी फ्रांसच्या सादीओ डुंबिया व फॅबियन रिबेल यांचा 6-2, 6-4 असा पराभव करून आगेकूच केली. एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत रशियाच्या एस्लन कारास्तेव याने स्पेनच्या पेड्रो मार्टिनेझचा 6-1,6-2 असा सहज पराभव करून आगेकूच केली.
जागतिक क्रमवारीत 17व्या स्थानी असलेल्या क्रोएशियाच्या मरीन चिलीचने या स्पर्धेतून माघार घेतली. मरीन सराव करत असताना त्याचा गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याने या स्पर्धेतून माघार घेतली. यावेळी दिलगिरी व्यक्त करताना मरीन म्हणाला की, या स्पर्धेतील आतापर्यंतचा माझा प्रवास विलक्षण राहिला आहे. चाहत्यांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे मी भारावून गेलो आहे. आगामी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व भारतात पुन्हा येण्यासाठी मी उत्सुक आहे. यामुळे नेदरलँडच्या टॅलन ग्रीक्सपूरला पुढे चाल देण्यात आली.
दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा सूरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजने जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल:
एकेरी: उपांत्यपूर्व फेरी:
एस्लन कारास्तेव(रशिया) वि.वि. पेड्रो मार्टिनेझ(स्पेन)6-1,6-2;
टॅलन ग्रीक्सपूर(नेदरलँड) पुढे चाल वि. मरीन चिलीच(क्रोएशिया)(1)
दुहेरी: उपांत्यपूर्व फेरी:
एन. श्रीराम बालाजी (भारत)/जीवन नेदुंचेझियान (भारत) वि.वि. नॅथॅनियल लेमन्स/जॅक्सन विथ्रो(अमेरिका)(2)7-6(6),7-6(5);
ज्युलियन कॅश(ग्रेट ब्रिटन)/हेन्री पॅटन(ग्रेट ब्रिटन) वि.वि. सादीओ डुंबिया/फॅबियन रिबेल(फ्रांस)6-2, 6-4.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटमधील खरेखुरे जंटलमन, ‘त्या’ एका कृतीने कपिल देव जगभरातील चाहत्यांच्या मनात पोहोचले
बंगळुरू एफसीला सतावतेय फॉरवर्ड लाईनची समस्या, नॉर्थ ईस्ट युनायटेडविरुद्ध विजयासाठी प्रयत्नशील