भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि सध्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या जीवनावरील चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सौरव गांगुलीने भारतीय संघाला यशाच्या शिखरावर पोहचवण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. सौरव गांगुली कारकिर्दीतील अनेक गोष्टींनी परिपूर्ण असलेल्या त्यांच्या जीवनावर चित्रपट केला जाणार असून यासाठी त्याने देखील परवानगी दिली आहे.
माधमांतील माहितीनुसार सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित चित्रपटात मुख्य भूमिका रणबीर कपूर साकारणार असल्याची चर्चा आहे. परंतु अजूनही त्यांच्या या भूमिकेसाठी नक्की कोणता अभिनेता असणार याचा अंतिम निर्णय झालेला नाही.
सौरव गांगुलीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “होय मी माझ्या जीवनावर चित्रपट बनविण्यासाठी परवानगी दिली आहे. हा चित्रपट हिंदी भाषेमध्ये असणार आहे. परंतु, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव सांगणे सध्या तरी शक्य नाही.” त्यानंतर गांगुलीला त्यांच्या भूमिकेसाठी कोणता अभिनेता योग्य ठरेल असा प्रश्न विचारला असता, त्यांनी स्वतः सांगितले की रणबीर कपूर त्यांची भूमिका निभावू शकतो.
परंतु, अजूनही अभिनेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. पण, सौरव गांगुलीची मुख्य भूमिका रणबीर कपूर शिवाय आणखी कोणते 5 अभिनेते करु शकतात याचा या लेखात आढावा घेऊ.
जीशू सेनगुप्ता
बंगाली अभिनेता जीशू सेनगुप्ता हा सौरव गांगुलीची भूमिका उत्तम पद्धतीने पार पाडू शकेल असे दिसून येत आहे. जीशू या अगोदर बर्फी, मर्दानी आणि पीकू यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे जीशूला डायलॉग बोलण्यासाठी बंगाली भाषा बोलण्यासाठी ट्रेनिंग घेण्याची गरजेचे नाही.
https://www.instagram.com/p/CRN_k6lNWwi/
विक्रांत मेस्सी
आपल्या अभिनयाचे कौशल्ये सिद्ध करणारा अभिनेता विक्रांत मेस्सी देखील सौरव गांगुलीचीही भूमिका साकारू शकतो. मिरजापूरसारख्या मालिकेत विक्रांतने आपली अभिनय शैली दाखवत चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्याचबरोबर हसीन दिलरुबामध्येही विक्रमच्या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
https://www.instagram.com/p/CQvAsciFpYY/
आर माधवन
चित्रपट असो वा टीव्ही मालिका, बॉलिवूड असो वा दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री आर माधवनने आपल्या कामाची छाप सर्वत्र सोडली आहे. माधवनकडे कोणतीही प्रकारची भूमिका साकारण्याचे कौशल्य आहे. सौरव गांगुलीची प्रतिमा रुपेरी पडद्यावर उत्तम पद्धतीने साकारू शकतो.
https://www.instagram.com/p/CHR9RuVj2zA/
हृतिक रोशन
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन देखील उत्तम अभिनय करतो. यापूर्वी अशी माहिती समोर आली होती की, हृतिक रोशन हा अभिनेता गांगुलीची भूमिका करू शकतो. हृतिक रोशनच्या नावावर सौरव गांगुलीलाही काही हरकत नव्हती, पण त्यांनी यासाठी अट ठेवली होती. ती म्हणजे गांगुलीच्या जीवनावर होणाऱ्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी हृतिक रोशनला त्याचे शरीर गांगुलीसारखे बनवावे लागेल, असे गांगुलीने एका कार्यक्रमा दरम्यान सांगितले होते.
https://www.instagram.com/p/CNNJZo4naDw/
फरहान अख्तर
अभिनेता फरहान अख्तर याने आपल्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ पाडली आहे. फरहान अख्तर सौरव गांगुलीची व्यक्तिरेखासुद्धा खूप छान साकारू शकतो. या अगोदर ‘भाग मिल्खा भाग’ या सुप्रसिद्ध चित्रपटात मिल्खा सिंग यांची व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी फरहानने एथलीटसारखे शरीर बनवले होते.
https://www.instagram.com/p/B8lBo-7Bojl/
आता नक्की कोणता अभिनेता गांगुलीची भूमिका साकारणार, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! विश्वचषकातील सुपर ओव्हरपूर्वी बेन स्टोक्स गेला होता सिगारेट प्यायला
मोठी बातमी! टेनिस स्टार रॉजर फेडररची टोकियो ऑलिम्पिकमधून माघार, ‘हे’ आहे कारण
आयपीएलदरम्यान आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने मुलीसोबत केली होती छेडछाड, कोर्टापर्यंत गेलते प्रकरण