---Advertisement---

आयपीएलच्या ६ संघांनी गाठली युएई; केवळ ‘हे’ २ संघ राहिले मागे आज होतील रवाना

On: शनिवार, ऑगस्ट 22, 2020 6:41 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) तेरावा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. संयुक्त अरब अमिराती (युएई)मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल २०२० साठी बीसीसीआयने पुर्वीच खूप कडक एसओपी जाहीर केली होती. त्यानुसार आयपीएलच्या वेगवेगळ्या संघातील सर्व खेळाडूंना युएईमध्ये गेल्यानंतर ६ दिवस सेल्फ आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे.

आयपीएल गवर्निंग काउंसिलच्या बैठकीत सांगितल्यानुसार, आयपीएल फ्रंचायझी २१ ते २२ ऑगस्टला युएईला रवाना होणार होते. त्यानुसार ६ संघ युएईला पोहोचले आहेत. तर उर्वरित २ संघ आज (२२ ऑगस्ट) अबु धाबी किंवा दुबईला जाण्यासाठी रवाना होतील. 6 Ipl Team Reached In UAE Remaining 2 Teams Will Depart Today

युएईमध्ये १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान शारजाह, अबु धाबी आणि दुबई येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. कोव्हिड-१९ दरम्यान होणाऱ्या या लीगचे आयोजन जैव सुरक्षित वातावरणात पार पडावे, यासाठी सर्व संघांना जवळपास एक महिनाआधी युएईला पोहोचावे लागणार आहे.

गुरुवारी राजस्थान रॉयल्स, किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ युएईच्या वेगवेगळ्या शहरात पोहोचले आहेत. तर, काल मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ युएईमध्ये दाखल झाले. असे म्हटले जात आहे की, श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आणि डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वाखालील सनराइजर्स हैद्राबाद हे उर्वरित २ संघ आज मुंबईवरुन युएईला जाण्यासाठी निघतील.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---