रविवारी (२२ मे) आयपीएल २०२२ हंगामाची साखली फेरी संपली. साखळी फेरीचा शेवटचा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादला ५ विकेट्सने पराभूत केले. पंजाब किंग्जचा आयपीएलच्या चालू हंगामातील प्रवास सहाव्या स्थानावर संपला. याचसोबत पंजाबच्या संघाने एक अनोखी कामगिरी केली आहे.
पंजाब किंग्ज (Punjab Kings) आयपीएलच्या इतिहासातील असा संघ बनला आहे, जो मागच्या सलग चार हंगामांमध्ये सहाव्या स्थानावर राहिला आहे. आयपीएल २०१९, आयपीएल २०२०, आयपीएल २०२१ आणि आता आयपीएल २०२२मध्ये देखील पंजाब किंग्ज गुणतालिकेत ६ व्या क्रमांकावर राहिला आहे. एवढेच नाही, ही सहावी वेघ आहे, जेव्हा पंजाब किंग्जने हंगामाचा शेवट गुणतालिकेत ६व्या स्थानावर असताना केला आहे.
हैदराबाद आणि पंजाब यांच्यात रविवारी झालेल्या सामन्याचा विचार केला, तर पंजाबने यामध्ये सहज विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघाने मर्यादित २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने हे लक्ष्य ६ विकेट्सच्या नुकसानावर आणि अवघ्या १५.१ षटकात गाठले.
पंजाब किंग्ज आयपीएलच्या मागच्या चार हंगामांमध्ये
आयपीएल २०१९ – गुणताकिलेत ६व्या स्थानी
आयपीएल २०२० – गुणतालिकेत ६व्या स्थानी
आयपीएल २०२१ – गुणतालिकेत ६व्या स्थानी
आयपीएल २०२२ – गुणतालिकेत ६व्या स्थानी
सनरायझर्स हैदराबादसाठी सलामीवीर अभिषेक शर्मा सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज ठरला. त्याने ३२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४३ धावांचे योगदान दिले. पंजाबच्या नेथन एलिसने चार षटकात ४० धावा खर्च करून हरप्रीत ब्रारने २६ धावा खर्च करून प्रत्येकी तीन-तीन विकेट्स नावावर केल्या. पंजाबची फलंदाजी आल्यानंतर सलामीवर शिखर धवन ३२ चेंडूत ३९ धावा करून बाद झाला, तर पाचव्या क्रमांकावर लियाम लिविंगस्टोनने अवघ्या २२ चेंडूत ४९ धावा ठोकल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. लिविंगस्टोनने या धावा २ चौकार आणि ५ षटकारांच्या जोरावर केल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पंजाबच्या हैदराबादवरील विजयाने साखळी फेरीचा शेवट, ५ विकेट्सने सामना घातला खिशात
मुंबईचा विजय दिल्लीच्या जिव्हारी! ‘या’ पाच चुकांमुळे पंतच्या संघाला मिळाली नाही प्लेऑफमध्ये एंट्री