मागच्या वर्षी अपूर्ण राहिलेली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका यापूर्वी पूर्ण केली जाणार आहे. बीसीसीआयने रविवारी (२२ मे) इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ घोषित केला. यामध्ये प्रसिद्ध कृष्णाला कसोटी पदार्पणाची संधी मिळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाचे गोलंदाजी आक्रमत उत्कृष्ट असणार आहे.
मागच्या वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चार सामने खेळले गेले आणि यामध्ये भारताने आघाडी घेतली आहे. परंतु शेवटचा निर्णयाक कसोटी सामना मात्र पूर्ण होऊ शकला नाही. संघांच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारतीय संघ मायदेशात परतला होता. आता हा राहिलेला एकमात्र कसोटी सामना यावर्षी पुन्हा आयोजित केला गेला आहे.
उभय संघातील हा कसोटी सामना १ जुलै रोजी बर्मिंघममध्ये सुरू होईल. भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी या कसोटी सामन्यासाठी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दिग्गज फिरकी जोडीला एकत्र निवडले आहे, तर वेगवान गोलंदाजी आक्रमण अधिकच घातक दिसत आहे. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि नवखा प्रसिद्ध कृष्णा यांना संघात निवडले गेले आहे. आता प्लेइंग इलेव्हनमध्ये यांच्यातील किती जणांना संधी मिळते, हे मात्र पाहावे लागणार आहे.
दरम्यान, इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पाच सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या तिघांना विश्रांती दिली गेली आहे, पण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात मात्र ते उपस्थित असणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारताला एक कसोटी, तीन सामन्यांची टी२० आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सातत्य फळाला आले! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी उमरान मलिकची भारतीय संघात निवड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहितसह भारताच्या ३ दिग्गजांना विश्रांती, पाहा कोण आहेत ते