इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ हंगाम अवघ्या काही दिवसांमध्ये संपणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी खेळला जाईल. मागच्या वर्षी भारतीय संघ इग्लंड दौऱ्यावर गेला होता. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चार सामने खेळले गेले होते, पण शेवटचा सामना कोरोनाच्या कारणास्तव स्थगित केला गेला होता. आता मागच्या वर्षीचा हा सामना १ जुलैपासून खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताकडून वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला कसोटी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयने रविवारी (२२ मे) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली. टी२० संघात उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या युवा खेळाडूंना पहिल्यांदाच निवडले गेले आहे आणि त्यांना पदार्पणाची संधी मिळू शकते, तर कसोटी संघात प्रसिद्ध कृष्णाला निवडले गेले आहे आणि त्याच्यासाठी ही कसोटी पदार्पणाची संधी आहे.
प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळला आहे, पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अद्याप संधी मिळालेली नाहीये. मागच्या वर्षी इंग्लंडविरुद्ध त्याने एकदिवसीय पदार्पण केले होते आणि यावर्षी त्याच संघाविरुद्ध त्याला कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. आयपीएल २०२२मध्ये त्याने राजस्थान रॉयल्ससाठी साखळी फेरीतील सर्व १४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.९३च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या आहेत आणि ८.१६च्या इकॉनॉमीने १५ विकेट्स घेतल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेआधी खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत मात्र कृष्णाला निवडले गेले नाहीये. रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. दरम्यानच्या काळात या तिघांना विश्रांती दिली गेली आहे, पण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ते संघात पुनरागमन करतील. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला कसोटी सामन्याव्यतिरिक्त तीन सामन्यांची टी२० आणि एकदिवसीय मालिका देखील खेळायची आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर , मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सातत्य फळाला आले! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी उमरान मलिकची भारतीय संघात निवड
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात ‘हा’ फलंदाज करणार पदार्पण, रणजी ट्रॉफीत झळकावलंय त्रिशतक