रविवारी (२२ मे) बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळाले. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या युवा गोलंदाजांना या टी२० मालिकेसाठी निवडले गेले आहे. दोघांनाही आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. अर्शदीप सिंगने आयपीएल २०२२ मध्ये चांगले प्रदर्शन केले होते, ज्याच्या जोरावर भारतीय संघात त्याने स्थान मिळवले आहे.
आयपीएल २०२२ हंगामात अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करत आहे. पंजाब किंग्जला रविवारी साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळायचा आहे, पण त्यांचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात हा सामना खेळला जाईल. या सामन्यात अर्शदीप कसे प्रदर्शन करतो, यावर अनेकांची नजर असणार आहे. कारण, आता त्याला भारतीय संघात संधी मिळाली आहे.
आयपीएलच्या चालू हंगामात त्याने आतापर्यंत १३ सामने खेळले, ज्यामध्ये ३६च्या सरासरीने १० विकेट्स घेऊ शकला. यादरम्यान त्याने टाकलेल्या ४६ षटकांमध्ये ७.८२च्या इकॉनॉमी रेटने ३६० धावा खर्च केल्या आहेत. ३७ धावा खर्च करून ३ विकेट्स हे त्याचे हंगामातील सर्वोत्तम प्रदर्शन ठरले आहे. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान पक्के केले आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या दिग्गजांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेतून विश्रांती दिली गेली आहे. रोहितच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करताना दिसेल. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी आयपीएलमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आणि संघात पुनरागमन केले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहितसह भारताच्या ३ दिग्गजांना विश्रांती, पाहा कोण आहेत ते
एमएसएलटीए सुहाना स्मार्ट टेनिस सर्किट स्पर्धेत समीक्षा शेट्टी, आरव शहा यांचा मानांकित खेळाडूंवर विजय
आयपीएलच्या १५ हंगामात शेवटून पहिला नंबर काढणारे संघ; याबाबतीत दिल्ली ‘टॉपर’