---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहितसह भारताच्या ३ दिग्गजांना विश्रांती, पाहा कोण आहेत ते

On: रविवार, मे 22, 2022 6:19 PM
Team-India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने रविवारी (दि. २२ मे) क्रिकेटप्रेमींना आनंदाची बातमी दिली. भारतीय संघ पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत दोन हात करणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या अनुभवी खेळाडूंनी विश्रांती देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी बीसीसीआयने (BCCI) जाहीर केलेल्या भारतीय संघातून रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना विश्रांती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, रोहित संघात नसल्यामुळे त्याच्या जागी भारताच्या टी२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुल याच्यावर सोपवण्यात आली आहे.

केएल राहुल पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट संघाची धुरा सांभाळेल. कारण, त्याने यापूर्वी कधीही भारताचे टी२० क्रिकेटमध्ये नेतृत्व केले नव्हते. त्याने वनडे क्रिकेटमध्ये ३ सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते. राहुलच्या टी२० कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ५६ टी२० सामन्यात ४०.६८च्या सरासरीने १८३१ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने २ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत.

महत्त्वाची बाब अशी की, या संघातून अनुभवी खेळाडू जरी वगळले असले, तरीही २ युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळू शकते. या दोन खेळाडूंमध्ये उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांच्या नावाचा समावेश आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

BREAKING : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या पुनर्नियोजित कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा

प्लेऑफमध्ये का पोहोचू शकली नाही दिल्ली? पाहा कर्णधार पंतने काय सांगितलंय कारण

‘आम्ही लयीत यायला उशीर केला, पण…’, रोहितची मुंबईच्या कामगिरीबद्दल मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---