इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल २०२२ हंगामात थैमान घातल्यानंतर आता युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यासाठी तयार आहे. उमरानचे आयपीएलमधील प्रदर्शन पाहून भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी त्याला राष्ट्रीय संघात निवडले आहे. आयपीएल संपल्यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडले गेले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही टी२० मालिका पाच सामन्यांची असणार आहे, जी भारतात खेळली जाईल. पहिला सामना ९ जून रोजी दिल्लीमध्ये खेळली जाईल. उमरान मलिक (Umran Malik) या सामन्यात त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल अशी शक्यता आहे. त्याचे आयपीएलमधील पदार्पण पाहता त्याला पहिल्या सामन्यापासून प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले जाण्याची शक्यता आहे.
उमरानचे आयपीएलच्या चालू हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने आतापर्यंत १३ सामने खेळले आहेत आणि यामध्ये २०च्या सरासरीने २१ विकेट्स नावावर केल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत सध्या तो पाचव्या क्रमांकावर आहे. या विकेट्स घेण्यासाठी त्याने ४७ षटके गोलंदाजी केली आणि ८.९३ च्या इकॉनॉमी रेटने ४२० धावा खर्च केल्या. हंगामात एका सामन्यात त्याने ४ विकेट्स, तर एका सामन्यात ५ विकेट्स घेण्याची कमाल देखील करून दाखवली आहे.
भारतीय संघात यापूर्वी अनेक दिग्गज वेगवान गोलंदाज होऊन गेले आहेत, पण भविष्यात उमरान त्या सर्वांना भारी पडण्याची शक्यता आहे. उमरान निरंतरपणे १५० किमी ताशी गतीपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करू शकतो. भारतीय संघाला आद्याप या गतीने गोलंदाजी करणारा गोलंदाज लाभला नाहीये. आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये उमरान त्याचा संघ सनरायझर्स हैदराबादसाठी महागात नक्कीच पडला, पण योग्य मार्गदर्शानंतर तो नक्कीच भारताचा महत्वाचा गोलंदाज बनू शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान नियमित कर्णधार रोहित शर्मा विश्रांतीवर आहे आणि केएल राहुल संघाचे नेतृत्व करताना दिसेल. रोहितव्यतिरिक्त विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या महत्वाच्या खेळाडूंना देखील विश्रांती दिली गेली आहे. दिग्गज अष्टपैलू हार्दिक पंड्या मोठ्या काळानंतर संघात पुनरागमन करणार आहे. तसेच, आयपीएलमधील धमाकेदार प्रदर्शनानंतर अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक देखील संघात पुनरागमन करणार आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळणार आहे.
https://twitter.com/BCCI/status/1528343993121374208?s=20&t=0-hMOgfN93YqtOT4UyMCtg
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत रोहितसह भारताच्या ३ दिग्गजांना विश्रांती, पाहा कोण आहेत ते
‘त्यांच्यामुळे रिव्ह्यू नाही घेतला’, डेविडला मिळालेल्या जीवनदानावर रिषभ पंतचे स्पष्टीकरण






