---Advertisement---

वुमेन्स बीबीएलमध्ये भारतीय महिलांचा बोलबाला; दोन दिवसात सात खेळाडू करारबद्ध

On: बुधवार, सप्टेंबर 29, 2021 6:27 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील वुमेन्स बिग बॅश लीगच्या सातव्या पर्वाचे बिगुल वाजले आहे. सर्व संघांनी या पर्वासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून, विविध खेळाडूंना करारबद्ध करण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारपर्यंत (२९ सप्टेंबर) भारताच्या महिला खेळाडूंना करारबद्ध करण्यास सुरुवात केली असताना, गुरुवारी आणखी एका युवा खेळाडूला मेलबर्न रेनेगेड्स संघाने आपल्या संघात समाविष्ट करून घेतले. विशेष म्हणजे भारतीय महिला टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर या संघाची सदस्य आहे.

ही मुंबईकर खेळाडू झाली करारबद्ध
वुमेन्स बिग बॅगच्या सातव्या हंगामासाठी मेलबर्न रेनेगेड्स संघाने भारताची मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज हिला करारबद्ध केले. मुंबईकर असलेली २१ वर्षीय जेमिमा प्रथमच वुमेन्स बिग बॅशमध्ये सहभागी होईल. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ लीगमध्ये केलेल्या शानदार कामगिरीचे बक्षीस म्हणून तिला हा करार मिळाल्याचे बोलले जात आहे. जेमिमाने या स्पर्धेत सात सामने खेळताना ४१.५० च्या सरासरीने २४९ धावा तडकावल्या होत्या. तीचा १५० चा स्ट्राईक रेट हा स्पर्धेतील सर्वोत्तम राहिला. तसेच, तिने खेळलेली ९२ धावांची खेळी देखील स्पर्धेतील सर्वाच्च ठरली.

या सहा खेळाडूही झाल्या आहेत करारबद्ध
जेमिमापूर्वी भारताच्या आणखी 6 खेळाडू विविध संघांशी करारबद्ध झालेल्या आहेत. भारतीय टी२० संघाचे उपकर्णधार स्मृती मंधना व अष्टपैलू दीप्ती शर्मा या दोघी सिडनी थंडर्ससाठी खेळतील. जगातील क्रमांक एकची टी२० फलंदाज शफाली वर्मा व फिरकीपटू राधा यादव या सिडनी सिक्सर्स संघाचा भाग असतील. १७ वर्षीय युवा यष्टीरक्षक रिचा हिलादेखील होबार्ट हरीकेन्सने संधी दिली आहे. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीदेखील मेलबर्न रेनेगेड्सचा भाग असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---