गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपटूंच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार केले जात आहेत. या चित्रपटातून त्या क्रिकेटपटूची कारकीर्द आणि जीवनातील प्रवास दाखवला जातो. एमएस धोनीचा ‘ एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट आणि सचिन तेंडुलकरचा ‘सचिन: द बिलियन ड्रीम्स’ चित्रपट प्रचंड गाजला होता. आता लवकरच १९८३ विश्वचषकावर अधारित चित्रपट देखील प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची भूमीका असलेला ‘८३’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हा चित्रपट माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने जिंकलेल्या १९८३ च्या विश्वचषकावर आधारित आहे. सोमवारी (२९ नोव्हेंबर) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.
या ट्रेलरच्या सुरुवातीलाच १९८३ विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात झालेला सामना दाखवण्यात आला आहे. यामध्ये कपिल देव यांची भूमीका निभावणारा रणवीर सिंग फलंदाजी करताना दिसून येत आहे. त्या सामन्यावेळी कपिल देव फलंदाजी करण्यासाठी गेले होते, त्यावेळी भारतीय संघाचे ९ धावांवर ४ गडी माघारी परतले होते. या ट्रेलरमध्ये तुम्ही पाहू शकता की, त्यावेळी भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकून टीका करणाऱ्यांना कसे सडेतोड उत्तर दिले होते.
हा चित्रपट येत्या २४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये पाहता येणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, की रणवीर सिंगने कपिल देव यांची हुबेहूब भूमिका साकारली आहे. तर दीपिका पदुकोणने कपिल देव यांच्या पत्नीची भूमीका साकारली आहे.
तसेच ताहिर राज भसीन, पंकज त्रिपाठी, साकिब सलीम, जतिन सरना, हार्डी संधू, एमी वर्की, साहिल खट्टर आणि आर बद्री सारखे स्टार्स ‘८३’ चित्रपटामध्ये झळकणार आहेत. या ट्रेलरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: शार्दुल ठाकूरच्या साखरपुड्याला हिटमॅनची हजेरी, अनोख्या अंदाजात रोहितकडून मित्राला शुभेच्छा
ठरलं तर! मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ साठी ‘या’ दोन खेळाडूंना करणार रिटेन?
आयपीएल २०२२ साठी कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला केले रिटेन, पाहा संपूर्ण यादी