---Advertisement---

ठरलं तर! मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ साठी ‘या’ दोन खेळाडूंना करणार रिटेन?

On: मंगळवार, नोव्हेंबर 30, 2021 11:54 AM
Mumbai-Indians
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ स्पर्धेत मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेत अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायजींची एन्ट्री झाली आहे. तर खेळाडूंचा मोठा लिलाव देखील होणार आहे. हा लिलाव होण्यापूर्वी सर्व फ्रेंचायजींना ३० नोव्हेंबरपर्यंत आपल्या संघातील रिटेन केलेल्या ४-४ खेळाडूंची यादी जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व फ्रेंचायजींनी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे. अशातच मुंबई इंडियन्स संघाने देखील २ खेळाडू रिटेन केले असल्याचे समजत आहे.

मुंबई इंडियन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. या संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू आहेत. परंतु, येणाऱ्या हंगामात हा संघ पूर्णपणे बदलेलेला दिसून येऊ शकतो. कारण मुंबई इंडियन्स संघाने कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वृत्त आहे.

मुंबई इंडियन्स संघाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला असेल. कारण या संघात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांचे नाव रिटेन करण्यासाठी सर्वात पुढे होते. यापूर्वी असे म्हटले जात होते की, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांच्यासह अनुभवी खेळाडू कायरन पोलार्डला देखील रिटेन करणार आहेत. तसेच भारतीय खेळाडूंमध्ये ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्यात देखील स्पर्धा रंगली होती. परंतु, या तीनही खेळाडूंपैकी एकालाही रिटेन करण्यात आले नाहीये.

तसेच मुंबई इंडियन्स संघातील तुफानी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या यांना देखील रिलीज करण्यात आले आहे. माध्यमातील वृत्तानुसार हे दोघेही खेळाडू अहमदाबाद फ्रेंचायजींच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आगामी स्पर्धेत हे दोघेही खेळाडू अहमदाबाद फ्रेंचायजीकडून खेळताना दिसून येऊ शकतात. तसेच मुंबई इंडियन्स संघाच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये जेतेपद पटकावले होते.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०२२ साठी कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला केले रिटेन, पाहा संपूर्ण यादी

मेस्सीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, तब्बल सातव्यांदा पटकावला मानाचा ‘बॅलन डी’ओर’

कधी आणि कुठे पाहू शकाल आयपीएल २०२२ रिटेंशन प्रक्रिया? जाणून घ्या एका क्लिकवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---