अर्जेंटिना संघाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नावे अनेक मोठ मोठ्या विक्रमांची नोंद आहे. तसेच त्याने अनेक अवॉर्ड देखील मिळवले आहेत. दरम्यान आता त्याला आणखी एक मोठा पुरस्कार मिळाला आहे.
लिओनेल मेस्सीने सोमवारी (२९ नोव्हेंबर) सातव्यांदा ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार पटकावत इतिहास रचला आहे. हा पुरस्कार संपूर्ण वर्षात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या फुटबॉलपटूला दिला जातो. हा वार्षिक पुरस्कार मिळवण्यासाठी त्याने पोलिश (बायर्न म्युनिक क्लब) च्या रॉबर्ट लेवांडोस्की आणि इटलीच्या जॉर्जिन्हो (चेल्सी) यांचा पराभव केला. यासह ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार मिळवण्याच्या बाबतीत लिओनेल मेस्सी, क्रिस्तिआनो रोनाल्डोच्या पुढे निघून गेला आहे.
लिओनेल मेस्सीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत ७ वेळेस हा पुरस्कार मिळवला आहे. तसेच क्रिस्टीआनो रोनाल्डोने ५ वेळेस या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. बार्सिलोनातून पीएसजीमध्ये दाखल झालेल्या मेस्सीने २००९ मध्ये पहिल्यांदाच वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान मिळवला होता. त्याने २००९, २०१०,२०११,२०१२, २०१५,२०१९ आणि आता २०२१ मध्ये ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार पटकावला आहे.
एकवेळ लिओनेल मेस्सीला असे वाटत होते की, त्याची कारकीर्द २०१९ मध्ये संपेल. याबाबत बोलताना तो म्हणाला होता की, “हा सन्मान मिळवणे खूप मोठी गोष्ट आहे. दोन वर्षांपूर्वी मला वाटले होते की,हे माझे शेवटचे वर्ष असेल.”
साल २००८ पासून ते आतापर्यंत मेस्सी आण रोनाल्डोने मिळून १२ वेळा ‘बॅलन डी’ओर’ पुरस्कार मिळवला आहे. यावरून अंदाज घेऊ शकतो की दोघही फुटबॉल विश्वातील किती महान खेळाडू आहेत. इतकेच नव्हे तर, लिओनेल मेस्सी हा पुरस्कार मिळवण्याच्या बाबतीत २००८, २०१३, २०१४, २०१६ आणि २०१७ मध्ये दुसऱ्या स्थानी होता. तर क्रिस्टीआनो रोनाल्डो २००७, २००९, २०११, २०१२, २०१५ आणि २०१८ मध्ये हा पुरस्कार मिळवण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी होता.
महिला गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार स्पेनच्या ऍलेक्सिया पुतेलास हिला मिळाला आहे. तिने बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
कधी आणि कुठे पाहू शकाल आयपीएल २०२२ रिटेंशन प्रक्रिया? जाणून घ्या एका क्लिकवर
धक्कादायक! फ्रान्सच्या स्टार फुटबॉलपटूला १ वर्षाची शिक्षा, कारण वाचून सरकेल तुमच्याही पायाखालची जमीन
द लिजेंड! छेत्रीने मोडला पेलेंचा विक्रम; आता मेस्सीच्या कामगिरीवर नजर