फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू करीम बेंझिमाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. त्याला सेक्स टेप व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याबद्दल एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ह्याचा अर्थ तो १ वर्ष संघातून निलंबित राहणार. त्यासोबतच व्हर्साइल कोर्टाने बेंझिमाला ८४,००० डॉलरचा (जवळ जवळ ६२ लाख रुपये) दंड भरायला लावला आहे.
ही केस २०१५ ची आहे. तेव्हा काही लोकं फ्रान्स फुटबॉल संघाचा खेळाडू मॅथियू वलबूयेनाला सेक्स टेप व्हायरल करून धमकी देत ब्लॅकमेल करत होते. त्या आरोपींमध्ये आता बेंझिमाचं नाव समोर आलेलं आहे. त्याने आपल्याच संघातल्या खेळाडू सोबत असं केल्याने त्याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.
शिक्षेमुळे बेंझिमाच्या कारकिर्दीवर जास्ती फरक नाही पडणार
ह्या शिक्षेमुळे ३३ वर्षीय बेंझिमाचे करियर संपुष्टात येताना दिसत नाही. त्याचा करियरवर जास्ती फरक नाही पडणार. करीम बेंझिमा स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदसाठी देखील खेळतो. ह्याचवर्षी त्याने गोलची हॅट्ट्रिक करत संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला होता. त्याचा हा हंगाम उत्कृष्ट गेला आहे आणि २९ नोव्हेंबरला घोषित होणाऱ्या बॅलेन डॉरसाठी प्रमुख दावेदार आहे. ह्या पुरस्काराची घोषणा पॅरिसमध्ये होणार आहे.
बेंझिमाचे वकील कोर्टात पुन्हा अपील करणार
फ्रान्सचा स्टार फुटबॉलर सुरुवातीपासूनच हे आरोप फेटाळत आला आहे. मागच्या महिन्यात जेव्हा सुनावणी झाली तेव्हा बेंझिमा कोर्टात उपस्थित नव्हता. त्याच्या शिवाय अन्य ४ आरोपींनाही दोषी ठरवण्यात आलं. ते चार जण देखील तेव्हा कोर्टात उपस्थित नव्हते.