---Advertisement---

‘आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके’ म्हटली की, आता सर्वांच्या तोंडात येणार ‘या’ २ संघांची नावे

On: सोमवार, सप्टेंबर 28, 2020 12:06 PM
---Advertisement---

रविवारी (२७ सप्टेंबर) शारजाह येथे इंडियन प्रीमियर लीगचा नववा सामना पार पडला. या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात राजस्थान संघाने ४ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. पंजाब संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ विकेट्स गमावत २२३ धावा केल्या होत्या. पंजाबचे २२४ धावांचे आव्हान राजस्थानने ६ विकेट्स गमावत केवळ १९.३ षटकात पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.

दरम्यान पंजाब संघाने एका खास विक्रमाची बरोबरी केली आहे. झाले असे की, राजस्थान संघाने नाणेफेक जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंजाबचा फलंदाज मयंक अगरवाल आणि केएल राहुल सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. मयंकने सुरुवातीपासूनच दमदार फटकेबाजी करायला सुरुवात केली आणि केवळ ५० चेंडूत १०६ कुटल्या.

मयंकपुर्वी कर्णधार राहुलनेही या हंगामातील पहिले शतक ठोकले होते. २४ सप्टेंबर रोजी दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात त्याने हा कारनामा केला होता. त्यावेळी सलामीला फलंदाजीसाठी उतरत राहुलने ६९ चेंडूत नाबाद राहत १३२ धावांची तूफानी खेळी केली होती.

या २ शतकांमुळे पंजाबने आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके मारणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाची बरोबरी केली आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात होण्यापुर्वी बेंगलोर संघाच्या नावावर सर्वाधिक १३ शतकांची नोंद होती. तर पंजाब संघाने एकूण ११ शतके लगावली होती. त्यामुळे या हंगामातील मयंक आणि राहुलच्या २ शतकांसह त्यांनी १३ शतकांचा आकडा गाठला आहे.

या २ संघांव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स या संघाने आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासात ८ शतके, तर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स संघाने प्रत्येकी ६ शतके केली आहेत. तसेच मुंबई इंडियन्सने ४ शतकांची नोंद आपल्या खात्यात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

युवराजची आठवण करून देणारा ‘तेवतिया’, एकाच षटकात ठोकले ‘इतके’ षटकार

मेड इन इंडिया! आयपीएलमध्ये दूसऱ्यांदाच घडला भारतीयांकडून ‘हा’ अनोखा विक्रम

गजब! २ तासांच्या आतच मोडला आयपीएलमधील ‘मोठा’ विक्रम

ट्रेंडिंग लेख-

अविश्वसनीय! पूरनचे क्षेत्ररक्षण पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्

असे २ भारतीय फलंदाज, ज्यांनी वयाची २१ वर्षे पूर्ण करण्याआधीच आयपीएलमध्ये ठोकलेत सर्वाधिक अर्धशतके

जेसन होल्डर ४ वर्षांनी उतरणार आयपीएलच्या मैदानात, जाणून घ्या त्याच्याबद्दल ३ खास गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---