कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील सामन्यांना स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता उर्वरित सामने 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान यूएईमध्ये आयोजित केले आहे. त्याचबरोबर 2022 मध्ये वर्षाच्या सुरूवातीस आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी मोठा लिलाव होणार आहे. या लिलावावर क्रिकेट तज्ञ, चाहते आणि समीक्षकांचे लक्ष आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटू या लिलावाबद्दल विविध अंदाज वर्तवत आहेत.
या लिलावापूर्वी प्रत्येक संघाला केवळ 4 खेळाडू कायम करण्याची परवानगी असणार आहे. तसेच त्यांना लिलिवादरम्यान राईट टू मॅच कार्ड वापरता येणार आहे. या गोष्टींचा विचार करता सर्व संघांनी योजना आखण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने मुंबई इंडियन्स कोणत्या 4 खेळाडूंना संघात कायम करेल, याबाबत अंदात व्यक्त केला आहे.
आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, मुंबई इंडियन्स संघात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या या 3 भारतीय खेळाडूंना कायम केले जाईल, ज्यांना 2023 मध्ये देखील फ्रॅंचाईजी संघात कायम ठेवू शकेल.
त्याचबरोबर आकाश चोपडा पुढे म्हणाला की, या हार्दिक किंवा बुमराह दोघेही राखून ठेवलेल्या रकमेत खूश होणार नाहीत. त्याच बरोबर तो पुढे म्हणाला की, यामध्ये रोहितला सर्वात आधी संघात कायम केले जाईल, तर दुसरा आणि तिसरा हार्दिक किंवा बुमराह असतील परंतु ते 7 कोटींच्या मानधनात खूश असेल. हा देखील थोडासा मुद्दा आहे.
त्याचबरोबर आकाश चोप्राने वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू पोलार्ड हा शेवटचा खेळाडू म्हणून आपली पसंती दाखवत मुंबई इंडियन्सने कायम ठेवला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, ‘मला वाटते की ते सुरुवातीला पोलार्डला संघात कायम ठेवतील. तर हे त्याचे चार राखून ठेवलेले खेळाडू असतील. या चार खेळाडूंव्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स क्विंटन डी कॉक आणि ट्रेंट बोल्ट या दोन खेळाडूंसाठी आरटीएमचा वापर करून संघात ठेवतील, कारण मागील दोन वर्षांत हे दोन खेळाडू महत्त्वपूर्ण ठरेल आहेत.’
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी आत्तापर्यंत 5 वेळा विजेतेपद जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसला तरी, आयपीएलमुळे युवा खेळाडूंमध्ये आहे आत्मविश्वास”
भारताविरुद्धच्या मालिकांआधी श्रीलंकेसाठी आली ‘ही’ आनंदाची बातमी