---Advertisement---

भारताविरुद्धच्या मालिकांआधी श्रीलंकेसाठी आली ‘ही’ आनंदाची बातमी

On: सोमवार, जुलै 12, 2021 8:11 PM
---Advertisement---

श्रीलंका क्रिकेटसंघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेच्या पहिल्या संघाला सोमवारपासून(12 जुलै) आर प्रेमादासा स्टेडियमवर सराव पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी प्रो. अर्जुन डी सिल्वा यांच्या अध्यक्षतेखालील श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे वैद्यकीय सल्लागार समितीकडून देण्यात आली आहे. भारतीय संघाविरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिकेपूर्वी श्रीलंकेचे ज्येष्ठ खेळाडू कुसल परेरा, दुष्मंथा चमिरा आणि धनंजय डी सिल्वा यांच्यासह संपूर्ण श्रीलंका संघाचा नुकत्याच झालेल्या आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत.

श्रीलंकेच्या डेली एफटीनुसार, श्रीलंका क्रिकेटचे सचिव मोहन डी सिल्वा म्हणाले की त्यांनी सिनेमन ग्रँड हॉटेलमध्ये जिमचे प्रशिक्षण सुरू केले आहे. परंतु, आजपासून (12 जुलै) श्रीलंका संघाचे खेतारामा येथे प्रशिक्षण सुरू होणार आहे. श्रीलंका संघाचे प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांच्याकडून प्रशिक्षण दिले जाणार नाही. संघाचे प्रशिक्षक अजूनही विलागिकरणात आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्ड अधिक सावधगिरी बाळगत आहे. कारण इंग्लंडहून परतल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवरच्या संपर्कात होते आणि ग्रँटची कोरोना चाचणी पॉजिटिव्ह आली होती.

श्रीलंका क्रिकेट सचिव यांनी सांगितले की, “इंग्लंडहून आलेले प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचार्‍यांकडून प्रशिक्षण घेतले जाणार नाही. कारण ते सर्वजण इंग्लंडमधून परतल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षक ग्रँट फ्लॉवर पॉझिटिव्ह असल्याचे समजले, त्यामुळे यांच्या संपर्कात असलेल्या सर्वच प्रशिक्षकांना विलगिकरणात ठेवले होते. प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी हे 14 जुलै पासून खेळाडूंसोबत सराव करण्यासाठी सामील होतील. तोपर्यंत खेळाडूंना स्वतःच सराव करावा लागेल. त्याचबरोबर प्रशिक्षक कर्मचारी खेळाडूंना सांगणार आहेत की काय करायचे आहे.”

श्रीलंका क्रिकेट सचिव प्रो. डी सिल्वा पुढे म्हणाले की, ते सध्या अधिक वेळा चाचणी घेत आहेत, तरी देखील प्रोटोकॉलनुसार ते जवळजवळ प्रत्येक तीन ते पाच दिवसांत खेळाडूंची चाचणी घेतली जाणार आहे.

सराव सुरू करणारा संघ भारता विरुद्ध मालिकेसाठी निवडलेला संघ असून नुकताच इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या काही खेळाडूंचाही यात समावेश आहे.

प्रो. डी सिल्वा पुढे म्हणाले की, “फ्लॉवर इंग्लंड संघातील काही लोकांच्या संपर्कात आले होता आणि त्यामुळेच त्यांना या व्हायरसची लागण झाली. त्यानंतर निरोशनलाही लागण झाली. यामुळेच संघ आणि प्रशिक्षक कर्मचार्‍यांना विलगीकरणात ठेवावे लागले आहे. त्यामुळेच भारतीय संघाविरुद्ध 13 जुलैला होणारी मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. फ्लॉवरला कोरोनाची लागण झाल्यामुळे हा पूर्ण दौरा पुढे ढकलण्यात येणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, “इंग्लंडमध्ये जे घडले ते येथे होणार नाही. पण मला वाटते की प्रत्येकाने समजले आहे आणि खेळाडू सर्व नियमांचे व्यवस्थित पालन करून नीट वागतील अशी आशा आहे.” इंग्लंड दौर्‍यादरम्यान श्रीलंकेचे तीन क्रिकेटपटू कुसल मेंडिस, निरोशन डिकवेला आणि दानुष्का गुणथिलाका यांनी बायो-बबल प्रोटोकॉल तोडल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने अशा कडक उपाययोजना केल्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

जेव्हा तब्बल ९ तास खेळपट्टीवर उभे राहात संजय मांजरेकरांनी भारताला वाचवले होते पराभवापासून, वाचा त्या खेळीबद्दल

इक्लेस्टोनने दोन भारतीयांना मागे टाकत जिंकला जूनमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार, पुरुष गटात कॉनवेने मारली बाजी

कधीकाळी चौकार-षटकार ठोकणारी बार्टी बनली विम्बल्डन विजेती; आयसीसीने खास व्हिडिओसह केले अभिनंदन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---