संपुर्ण नाव- राजीव रमेश कुलकर्णी
जन्मतारिख- 25 सप्टेंबर, 1962
जन्मस्थळ- बॉम्बे (आताची मुंबई), महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत आणि मुंबई
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज
आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तारिख – 15 ते 19 ऑक्टोबर, 1986, ठिकाण – मुंबई
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, तारिख – 17 डिसेंबर, 1983, ठिकाण – गुवाहाटी
आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 3, धावा- 2, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 3, विकेट्स- 5, सर्वोत्तम कामगिरी- 3/85
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 10, धावा- 33, शतके- 0
गोलंदाजी- सामने- 10, विकेट्स- 10, सर्वोत्तम कामगिरी- 3/42
थोडक्यात माहिती-
-राजू कुलकर्णी यांचे क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला स्वत:वर जास्त नियंत्रण नसल्याने, त्यांना बऱ्याचदा अडचणी आल्या होत्या. मात्र, पुढे जसा त्यांचा क्रिकेट क्षेत्रातील अनुभव वाढत गेला. तसे त्यांनी स्वत:वर नियंत्रण ठेवत आपल्या गोलंदाजी शैलीत बदल केले. त्यांनी वेगवान गोलंदाजीसह स्विंग गोलंदाजीही शिकून घेतली होती.
-त्यांनी 1982-83 सालच्या रणजी ट्रॉफी उपांत्य सामन्यात 111 धावा देत 8 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या रणजीतील या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना वनडेत भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती.
-1984च्या झिम्बाब्वे दौऱ्यावर ते भारतीय संघाचा भाग होते, मात्र त्यांना संघातील 11 जणांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
-1986-87साली कुलकर्णी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. मजेशीर गोष्ट अशी होती की, त्यांना संघ निवडताना संघात स्थान मिळाले नव्हते. तर, कसोटी मालिकेच्या तिसऱ्या सामन्याच्यादिवशी सकाळी त्यांना कॉल करून संघात संधी मिळाल्याची बातमी देण्यात आली होती. यावेळी गोलंदाजी करताना त्यांनी 3 विकेट्स घेतल्या होत्या.
-कुलकर्णी हे 1987 साली पाकिस्तानविरुद्धच्या 2 कसोटीत भारतीय संघाचा भाग होते. यातील चेन्नईला झालेल्या सामन्यात त्यांनी 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर कोलकाताला त्यांनी खेळलेल्या कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीत एकही विकेट घेतली नव्हती
-1990च्या आशिया चषकातही ते भारतीय संघाचा भाग होते. मात्र, त्यांना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी 1992-93साली क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती घेतली.
-निवृत्तीनंतर राजू यांनी क्रिडा साधनांचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली.