भारतीय संघ जून महिन्यात ऑयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारताच्या १७ जणांचा संघ घोषित झाला आहे. या दौऱ्यात भारत विरूद्ध आयर्लंड यांच्यात २ सामन्यांची टी२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा महान खेळाडू विलियम पोर्टरफील्ड (William Porterfield) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
पोर्टरफील्डने वयाच्या ३७व्या वर्षी क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. त्याची आतंरराष्ट्रीय कारकिर्द १६ वर्षाची राहिली. यादरम्यान त्याने आयर्लंडकडून २०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. तो आयर्लंडचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार राहिला आहे. वनडे क्रिकेटमध्ये आयर्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याआधी केविन ओब्रायनचा क्रमांक लागतो.
विश्वचषक स्पर्धांमध्ये आयर्लंडच्या संघाने अनेक मोठ्या संघाना पराभवाचा धक्का दिला आहे. २००७च्या वनडे विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडने पाकिस्तान संघाला पराभूत केले होते तेव्हा पोर्टरफील्ड संघाचा युवा सदस्य होता. चार वर्षानंतर संघ विश्वचषकात पोहोचला तेव्हा तो संघाचा कर्णधार होता. २०११च्या वनडे विश्वचषक स्पर्धेमध्ये आयर्लंडने इंग्लंडला पराभूत करत क्रिकेटविश्वात खळबळ माजवली होती.
आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये आयर्लंडची प्रगती पुढे अशीच सुरू राहिली. त्यांची ही कामगिरी पाहता आयसीसीने त्यांना कसोटी क्रिकेटचा दर्जा दिला. पहिल्या वहिल्या कसोटी सामन्याच्या नेतृत्वाची जबाबदारी पोर्टरफील्डनेच सांभाळली होती.
पोर्टरफील्डने २००६मध्ये स्कॉटलंड विरुद्ध वनडे क्रिकेट खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने २१२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यातील १७२ सामन्यात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. त्याने तिन्ही क्रिकेट प्रकारापैकी सर्वाधिक वनडे क्रिकेटचे सामने खेळले आहेत. १४८ वनडे सामन्यात त्याने ११ शतके आणि २० अर्धशतकाच्या साहाय्याने ४३४३ धावा केल्या आहेत. त्याने ६१ टी२० सामने खेळताना १०७९ धावा केल्या आहेत. त्याला फक्त तीनच कसोटी सामने खेळता आले.
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच आयर्लंडच्या कर्णधाराने संन्यास घेतल्याचे वृत्त संघासाठी निराशाजनक आहे. या मालिकेत पहिला टी२० सामने २६ जून आणि २८ जूनला दुसरा टी२० सामना खेळणार जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आठवणीतील सामना: २३ वर्षांपूर्वी झाला होता क्रिकेट विश्वचषकातील सर्वात रोमांचकारी सामना, पाहा व्हिडिओ
‘कष्टाचं फळ मिळालं!’ संघात निवड झाल्यानंतर राहुल त्रिपाठीची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाला
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या सुवर्णकाळातील ‘अखेरचा’ शिलेदार