क्रिकेटटॉप बातम्या

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बांग्लादेशचा संघ जाहीर, 26 वर्षीय खेळाडूची कर्णधारपदी वर्णी

न्यूझीलंड पाठोपाठ बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे. या मेगा स्पर्धेसाठी संघ जाहीर करणारा बांग्लादेश हा तिसरा संघ ठरला आहे. आतापर्यंत इंग्लंड आणि न्यूझीलंडने संघ जाहीर केला आहे. आयसीसीने सर्व संघांना त्यांचे तात्पुरते संघ जाहीर करण्यासाठी 12 जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. परंतु सर्व संघांना 1 महिन्यासाठी कोणत्याही परवानगीशिवाय संघात बदल करण्याचे स्वातंत्र्य असेल.

बांग्लादेशच्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास संघात एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. जो की अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसनला संघात स्थान देण्यात आलेले नाही. शाकिब अल हसनची गोलंदाजी अ‍ॅक्शनची नुकतीच चेन्नईमध्ये चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये तो अपयशी ठरला. कदाचित त्याला निवड न करण्यामागे हेच मोठे कारण असावे. मात्र आणखी एक उत्कृष्ट अष्टपैलू महमदुल्लाहला संघात निश्चितच स्थान मिळाले आहे. सौम्या सरकार देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांग्लादेश संघाचा भाग आहे. अशा परिस्थितीत संघ संतुलित दिसत आहे.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बांग्लादेश संघाचा कर्णधार म्हणून नझमुल हुसेन शांतोची निवड करण्यात आली आहे. मात्र, संघात शकिब अल हसनची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवू शकते. मुशफिकुर रहीम आणि महमुदुल्ला हे संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून भूमिका बजावतील. ज्याची मदत कर्णधार नझमुल हुसेन शांतोला नक्कीच होईल.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी बांग्लादेशचा संघ-

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, तौहीद हृदया, मुशफिकुर रहीम, झाकीर अली, परवेझ हुसेन इमोन, सौम्या सरकार, महमुदुल्लाह, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, नाहिद राणा, नसुम अहमद आणि तन्झीम हसन शाकिब. 

हेही वाचा-

“भारतीय खेळाडूंना पैशाचं वेड, आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळाला की…”; ऑस्ट्रेलियन खेळाडूची सडकून टीका
वरिष्ठ खेळाडूंची मनमानी चालणार नाही, आढावा बैठकीत बीसीसीआयचा मोठा निर्णय
रोहित शर्मा बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान निवृत्ती घेणार होता, यामुळे निर्णय बदलला

Related Articles