पुणे (20 मार्च 2024) – आजचा शेवटचा सामना नंदुरबार विरुद्ध सांगली यांच्यात झाला.प्रमोशन फेरीत सांगली संघाने पहिला सामना जिंकला होता तर नंदुरबार संघाने आपला पहिला सामना गमावला होता. नंदुरबार संघाने जोरदार सुरुवात करत सामन्यात आघाडी मिळवली. नंदुरबारने सांगली संघाला ऑल आऊट करत 15-06 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर पुढील काही मिनिटात सांगली संघावर लोन पाडत नंदुरबार संघाने 24-06 अशी आघाडी घेतली.
नंदुरबारच्या जयेश महाजन ने सुपर टेन पूर्ण करत निर्यायक खेळी केली. तर वरून खंडले ने अष्टपैलू खेळ करत महत्वपूर्ण गुण मिळवले. नंदुरबार संघाने मध्यंतरा पर्यत 33-15 अशी आघाडी मिळवली होती. मध्यांतरा नंतर नंदुरबार ने तिसरा लोन देत सांगली संघाला ऑल आऊट केले. त्यानंतर सांगली संघाने प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला पण नंदुरबार संघा समोर त्यांचा टिकाव लागला नाही.
नंदुरबार संघाने 60-33 असा विजय मिळवला. नंदुरबार कडून जयेश महाजन ने चढाईत सर्वाधिक 15 गुण मिळवले. वरून खंडले ने अष्टपैलू खेळ करत 9 गुण तर तेजस राऊत ने सुद्धा अष्टपैलू खेळ करत 8 गुण मिळवले. तर ओमकार गाडे ने हाय फाय पूर्ण पकडीत एकूण 5 गुण मिळवले. सांगली कडून अभिराज पवार ने 8 गुण मिळवले. नंदुरबार संघाने विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
बेस्ट रेडर- जयेश महाजन, नंदुरबार
बेस्ट डिफेंडर- ओमकार गाडे, नंदुरबार
कबड्डी का कमाल – प्रसन्न पाटील, सांगली
महत्वाच्या बातम्या –
अश्विन ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचं काय नातं? सोशल मीडिया पोस्टमुळे सुरू झाली चर्चा
आयपीएलचा पहिला सामना कधी आणि कुठे मोफत पाहता येईल? जाणून घ्या सविस्तर