पुणे। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील १४ वा सामना बुधवारी (६ एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात रंगणार आहे. या हंगामातील कोलकाता नाईट रायडर्सचा हा चौथा सामना आहे, तर मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना आहे.
कोलकाताने आत्तापर्यंत खेळलेल्या ३ सामन्यांपैकी २ सामने जिंकले आहेत, तर १ सामना पराभूत झाले आहेत. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने खेळलेल्या पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करला आहे.
असे असू शकतात संभावित संघ
बुधवारच्या सामन्यासाठी श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या संभावित ११ जणांच्या संघाबद्दल (KKR Predicted 11) विचार करायचा झाल्यास अंजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यर सलामीला फलंदाजी करू शकतात. त्याबरोबर मधली फळी श्रेयससह नितीश राणा, सॅम बिलिंग्स सांभाळू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून आंद्र रसल आणि सुनील नारायण संघात असतील. गोलंदाजीची सर्वाधिक जबाबदारी शिवम मावी, उमेश यादव, टीम साऊदी, वरूण चक्रवर्ती यांच्यावर असू शकते.
त्याचबरोबर आयपीएलमधील एक यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संभावित ११ जणांच्या (MI Predicted 11) संघाबद्दल बोलायचे झाल्यास, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नेहमीप्रमाणे यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनसह सलामीला फलंदाजी करू शकतो. त्याचबरोबर अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा मधली फळी सांभाळू शकतात. त्याचबरोबर अष्टपैलू म्हणून कायरन पोलार्डसह टीम डेव्हिड आणि डॅनिएल सॅम्स यांना संधी मिळू शकते. गोलंदाजीत मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह आणि बासिल थंपी हे महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.
आमने-सामने
कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स (Kolkata Knight Riders vs Mumbai Indians) संघ आत्तापर्यंत २९ वेळा आमने-सामने आले आहेत. यात २२ सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत. तसेच कोलकाता नाईट रायडर्सने ७ सामने जिंकले आहेत.
हवामान आणि खेळपट्टी
कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे (MCA Stadium, Pune) येथे सामना होणार आहे. या सामन्यावेळी ३१ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान तापमान असेल. तसेच पुण्यातील खेळपट्टीबद्दल सांगायाचे झाले तर, फलंदाजांना सुरुवातीला मदत मिळते. पण फिरकी गोलंदाजांचेही येथे वर्चस्व दिसून येते.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) कोलकाता विरुद्ध मुंबई (KKR vs MI) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना ६ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे, पुणे येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
मुंबई इंडियन्स संघ: इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी, सूर्यकुमार यादव, जयदेव उनाडकट, फॅबियन ऍलन, संजय यादव, रिले मेरेडिथ, रमणदीप सिंग, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, अर्शद खान, डेवाल्ड ब्रेविस.
कोलकाता नाईट रायडर्स संघ: अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद नबी, पॅट कमिन्स, शेल्डन जॅक्सन, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीथ, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, प्रथम सिंग, अभिजीत तोमर, रसिक सलाम, अमन हकीम खान, अशोक शर्मा, रमेश कुमार
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) कोलकाता विरुद्ध मुंबई (KKR vs MI) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना ६ एप्रिल २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे, पुणे येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील कोलकाता विरुद्ध मुंबई सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
मुंबई इंडियन्स संघ: इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी, सूर्यकुमार यादव, जयदेव उनाडकट, फॅबियन ऍलन, संजय यादव, रिले मेरेडिथ, रमणदीप सिंग, मयंक मार्कंडे, आर्यन जुयाल, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, राहुल बुद्धी, अर्शद खान, डेवाल्ड ब्रेविस.
कोलकाता नाईट रायडर्स संघ: अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, टीम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद नबी, पॅट कमिन्स, शेल्डन जॅक्सन, चमिका करुणारत्ने, बाबा इंद्रजीथ, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, प्रथम सिंग, अभिजीत तोमर, रसिक सलाम, अमन हकीम खान, अशोक शर्मा, रमेश कुमार.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून दिलीप वेंगसरकरांना म्हटलं जातं ‘लॉर्ड ऑफ लॉर्ड्स’; गावसकर-सचिनलाही तोडता आला नाही विक्रम
स्वस्तात आऊट झाल्यावर तंबूत मॅक्सवेलची मालीश करताना दिसला विराट कोहली, Video तुफान Viral
RR vs RCB | बेंगलोरचा विजयरथ सुसाट, राजस्थानला ४ विकेट्सने हरवत नोंदवला सलग दुसरा विजय