चेन्नई येथे इंग्लंड विरुद्ध भारताचा दुसरा कसोटी सामना या अत्यंत रोमांचक स्थितीत पोहचला असून भारतीय संघ आपल्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. दुसऱ्या कसोटीत भारताने उभारलेल्या ३२९ धावांच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या १३४ धावांवर उरकला. त्यामुळे भारतीय संघाला १९५ धावांची आघाडी मिळाली आहे. दरम्यान या सामन्याबद्दल अनेक माजी क्रिकेटपटू ट्विटरद्वारे व्यक्त होत आहेत. यात मायकल वॉन आणि शेन वॉर्न या माजी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन हा बऱ्याचदा आपल्या ट्विटमुळे ट्रोल होत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याने भारताच्या एकतर्फी विजयाची भविष्यवाणी केली होती. पुढे इंग्लंडच्या संघाची चांगली कामगिरी पाहून इंग्लंड विजयी होईल, असे देखील तो म्हणाला. परंतु आता पुन्हा एकदा तो आपल्या एका वेगळ्याच ट्विटमुळे चर्चेत आला आहे.
चेन्नई येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर भारत २४९ धावांनी आघाडीवर होता. अशाप्रकारे भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत चांगली कामगिरी करत असताना दुसरीकडे इंग्लंडची खराब कामगिरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर इंग्लंडच्या खराब कामगिरीसाठी वॉनने चेन्नईच्या खेळपट्टीला जबाबदार धरले आहे.
‘पहिल्या २ सत्रात खेळपट्टीवर चेंडूला जास्त स्पिन मिळत नव्हता. परंतु इंग्लंडचे फलंदाज मैदानावर उतरले आणि खेळपट्टीवर चेंडूला स्पिन मिळू लागला. भारतीय संघ अशाप्रकारे जर आपल्या पाहिल्या कसोटीत खेळला असता, तर तो सामना अनिर्णित ठरला असता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी चेन्नईची खेळपट्टी चांगली नाही,’ असे वॉनने मत मांडले आहे.
याउलट ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडू शेन वॉर्न हा मायकलच्या या मताशी सहमत नसून त्याने यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. त्याच्या मते, जेव्हा भारतीय संघाकडे कोणती संधी नव्हती. त्यावेळी खेळपट्टीबद्दल कोणी काहीच बोलले नाही.
भारताच्या पहिल्या डावात ३२९ धावांच्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा पहिला डाव कोसळण्यास सुरवात झाली तेव्हा वॉर्नने प्रत्युत्तर देत ट्विट केले की, ‘दुसऱ्या कसोटीत पहिल्या चेंडूपासून दोन्ही बाजूंनी खेळपट्टी समान होती. इंग्लंडने खराब गोलंदाजी केली होती, परंतु या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी हे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांनी चांगले दाखवून दिले. त्यामुळे दोन्ही पक्षांची परिस्थिती समान आहे.’
Come on maaaaaate ! The last few days of the 1st test, the wicket started exploding & no one said a word about the pitch when India had no chance. At least this test it’s been the same for both teams from ball one. Eng bowled poorly & Rohit, Pant and Jinx showed how to bat. https://t.co/lx31k7BqCl
— Shane Warne (@ShaneWarne) February 14, 2021
There’s no diff between the ball seaming/spinning to much. We always want a fair contest between bat/ball. India have batted & bowled better than Eng in this match – simple. Conditions have been the same for both sides from ball one. But this is excessive & in favour of the ball https://t.co/lx31k7BqCl
— Shane Warne (@ShaneWarne) February 14, 2021
पिटरसनने देखील उठवला प्रश्न
भारताच्या पराभवानंतर ट्विट करून मजा घेणाऱ्या पिटरसनने देखील नाणेफेकीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. त्याने विचारलं की नाणेफेक जिंकणे म्हणजे सामना जिंकणे आहे का? आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये देखील टोमणा मारत तो म्हणाला की, “अशी खेळपट्टी बनवून भारताने अत्यंत धाडसी निर्णय घेतला आहे. कारण जर भारत नाणेफेक हरला असता, तर यावेळी जी अवस्था इंग्लंडची आहे ती भारताची झाली असती.”
https://twitter.com/KP24/status/1360874504256372739
सामन्यात भारताचे वर्चस्व –
भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे भारताने पहिल्या डावातील १९५ धावांच्या आघाडीसह इंग्लंडला ४८२ धावांचे आव्हान दिले आहे. तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ३ बाद ५३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कृतीमुळे पस्तावणार विराट कोहली? होऊ शकते बंदीची कारवाई
खाली डोके वर पाय..! भर सामन्यात बेन स्टोक्सची अतरंगी चाल, पाहून आठवतील बालपणीच्या करामती
शुभमंगल सावधान! ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर बेन कटिंगने ‘या’ प्रसिद्ध मॉडेलशी बांधली लग्नगाठ