संपूर्ण भारत देश सध्या कोविड-१९ महामारीशी लढा देत आहे. मोठमोठे सेलिब्रेटी, क्रिकेटपटू या लढ्यात सहभाग घेत मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि दिल्लीचा खासदार गौतम गंभीर हासुद्धा कोरोना काळात पिडीतांच्या मदतीसाठी दिवस-रात्र झटत आहे. तो आणि त्याचे फाउंडेशन मिळून शक्य तितकी सेवा पुरवण्यासाठी पुढाकार देताना दिसत आहेत. परंतु याच कारणास्तव गंभीरपुढील समस्या वाढल्या आहेत. तो सध्या दिल्ली पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याची चौकशी केली जाणार आहे.
एका ट्विटमुळे गंभीर सापडला अडचणीत
त्याचे झाले असे की, २५ एप्रिल रोजी गंभीरने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक ट्विट केले. यामध्ये त्याने आपल्या फाउंडेशनच्या वतीने फॅबीफ्ल्यू (Fabiflu) या गोळ्या (टॅबलेट्स) वाटपाची घोषणा केली होती.
त्याने लिहिले होते की, ‘आपणा सर्वांना या परिस्थितीत जगण्यासाठी एकमेकांसोबत उभे राहण्याची गरज आहे. आम्ही दिल्लीवासीयांसाठी फॅबीफ्ल्यू गळ्या उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात आहोत. याचे वितरण तुम्हाला दिल्लीतील जीजीएफ ऑफिस (२२, पुसा रोड) येथे १० ते ४ या कालावधीत करण्यात येईल. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन दाखवावी लागेल. याखेरीज आम्ही ऑक्सीजन सिलेंडरही उपलब्ध करुन देणार आहोत.’
We all have to stand by each other to survive. Will provide ‘Fabiflu’ to as many as we can in Delhi from GGF office (22, Pusa Road) between 10-4 from tmrw for FREE. Kindly bring Aadhar & prescription. Arranging for more O2 cylinders as well. #InThisTogether
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) April 25, 2021
दिल्ली पोलिसांच्या रडावर गौतम गंभीर
गंभीरने लोकांच्या हिताचा विचार करत फॅबीफ्ल्यू गोळ्या वाटपाचे कार्य करण्याचा विचार केला. परंतु याचमुळे त्याच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. येत्या काही दिवसांत या प्रकरणासंबंधी दिल्ली पोलिस त्याची चौकशी करणार आहेत. गंभीरला या गोळ्या कुठून मिळाल्या याचा शोध दिल्ली पोलिसांना आहे. त्यातही काही नेत्यांनी त्याच्या गोळ्या वितरणाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केल्याने पोलिसांना उत्तर शोधाण्यासाठी गंभीरची चौकशी करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जास्तीच बोट ऋतिककडे आहे, पण काड्या..’ विराटवर निशाणा साधणाऱ्या वॉनला भारतीय दिग्गजाची सणसणीत चपराक
सध्याचा खराब फॉर्म अन् इंग्लंडमधील चिंताजनक आकडेवारी, रहाणेला WTC Finalमध्ये जागा मिळणार का?