आज(17 ऑक्टोबर) भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज अनिल कुंबळेचा 49 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागनेही कुंबळेला नेहमीच्या हटके शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कुंबळेला त्याच्या दुसऱ्या कसोटी शतकापासून वंचित ठेवल्याबद्दल सेहवागने माफीही मागितली आहे.
सेहवागने ट्विट केले आहे की ‘भारताला सामने जिंकवून देणारा दिग्गज आणि आदर्श खेळाडू. अनिल भाई तूला दुसऱ्या शतकापासून वंचित ठेवल्याबद्दल माफ कर. पण मी प्रार्थना करतो की तू तूझ्या आयूष्याचे शतक पूर्ण करावे. फक्त अजून 51 राहिले आहे. कमऑन..कमऑन अनिल भाई! वाढदिवसाच्या शुभेच्छा.’
One of India’s greatest ever Match winners and a terrific role model. Sorry for depriving you of your second century @anilkumble1074 bhai. But I pray that you score a century in real life. Only 51 more to go.. come on ..come on Anil Bhai ! Happy Birthday pic.twitter.com/P7UnvoLBlU
— Virender Sehwag (@virendersehwag) October 17, 2019
सेहवागच्या या शुभेच्छाच्या ट्विटला प्रतिक्रिया देताना कुंबळेने धन्यवाद म्हटले आहे.
Thanks Viru. You always have a knack of saying…😀
— Anil Kumble (@anilkumble1074) October 17, 2019
कुंबळेने त्याचे पहिले कसोटी शतक इंग्लंड विरुद्ध 2007 मध्ये केले होते. त्यानंतर जानेवारी 2008 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ऍडलेडला झालेल्या कसोटी सामन्यात कुंबळे त्याच्या दुसऱ्या कसोटी शतकाच्या जवळ होता.
मात्र चहापानाची विश्रांती झाल्यानंतर पहिल्या डावात 86 धावांवर खेळणाऱ्या कुंबळेला सेहवागने आक्रमक खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सेहवागचे ऐकून आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केलेला कुंबळे 87 धावांवर बाद झाला होता. त्यामुळे कुंबळे त्याचे दुसरे कसोटी शतक न होण्यासाठी सेहवागला जबाबदार धरतो. याबदद्ल त्याने एका मुलाखतीतही सांगितले आहे.
.@anilkumble1074 talks of the hazards of taking @virendersehwag's advice on #KentCricketLive only on Star Sports! pic.twitter.com/AVp2dGZNdo
— Star Sports (@StarSportsIndia) October 2, 2016