Smriti Mandhana :- महिला आशिया चषक श्रीलंकेतील दांबुला येथे खेळला जात आहे. 26 जुलैला भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिला उपांत्य सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने 10 गडी राखून विजय संपादन केला. यासह भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारतीय उपकर्णधार स्मृती मंधाना हिने या सामन्यात एक विक्रम केला.
या सामन्याआधी हरमनप्रीत कौर ही टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. परंतु, आता स्मृती मंधाना पहिल्या क्रमांकावर विराजमान झाली आहे. मात्र, या दोघींमधील धावांचे अंतर जास्त नाही. त्यामुळे हरमनप्रीत पुन्हा कधीही नंबर वन बनू शकते. हरमनप्रीतने भारतासाठी आतापर्यंत 172 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात तिने 3415 धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि 12 अर्धशतके झळकावण्यात यश मिळवले आहे.
आता स्मृतीच्या नावे 140 टी20 सामन्यात 3433 धावा बनवताना 28.30 अशी सरासरी राखली आहे. तसेच तिचा स्ट्राइक रेट 122 पेक्षा जास्त असून, 25 अर्धशतकांचा समावेश आहे.
बांगलादेशविरुद्धच्या आशिया कपच्या उपांत्य फेरीत आज स्मृतीने शानदार फलंदाजी केली. तीने 39 चेंडूत 55 धावांची शानदार खेळी केली. तीच्या बॅटमधून 9 चौकार आणि एक षटकार आला. यादरम्यान तिचा स्ट्राइक रेट 141.03 होता. तिने 10व्या षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर लागोपाठ तीन चौकार मारून भारताला विजय तर मिळवून दिला.
या सामन्यात भारतानं बांगलादेशवर 10 गडी राखून सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 8 गडी गमावून अवघ्या 80 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने 81 धावांचू लक्ष्य 11 षटकांत एकही गडी न गमावता गाठलं. यासह भारतीय संघानं सलग 9 व्यांदा आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा –
आशिया चषक 2024 : सेमिफायनलमध्ये रेणुका सिंगचा कहर! भारताचा सलग नवव्यांदा फायनलमध्ये प्रवेश
पांड्या नव्या भूमिकेत, प्रशिक्षक गंभीरचा फॉर्म्युला टीम इंडियाला टी20 मालिका जिंकण्यास मदत करेल का?
शुबमन गिलचं प्रमोशन! वनडे-टी20 पाठोपाठ कसोटी संघातही मिळू शकते मोठी जबाबदारी