मुंबई । आज दिवाळीची सुट्टी संपवून भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये जोरदार सराव केला. त्यात कर्णधार विराट कोहली, माजी कर्णधार एमएस धोनी, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलसह अन्य खेळाडूंचा समावेश होता.
यावेळी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विराट कोहलीला नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. बीसीसीआयने याची छायाचित्र आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहेत.
We are at the Wankhede Stadium and our preparations for the #INDvNZ have begun. pic.twitter.com/DoeBzcCXSc
— BCCI (@BCCI) October 20, 2017
भारतीय संघ रविवारपासून न्यूजीलँड विरुद्ध वनडे मालिकेत दोन हात करणार आहे. अर्जुनची यापूर्वीच मुंबईच्या अंडर १९ संघात रणजी मालिकेसाठी निवड झाली असून तो ५व्या श्री जे वाय लेले ऑल इंडिया अंडर १९ आमंत्रितांच्या स्पर्धेत खेळताना दिसला.
यापूर्वीही अर्जुनला इंग्लंड देशात भारतीय महिला क्रिकेटपटूंना नेटमध्ये गोलदांजी करताना पहिले होते.