भारतीय महिला संघाची वनडे कर्णधार मिताली राज आज(3 डिसेंबर) 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताकडून सर्वाधिक वनडे सामने खेळणारी मितालीने वयाच्या 16 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.
आत्तापर्यंत तिने 10 कसोटी सामन्यात 663धावा, 209 वनडे सामन्यात 6888 धावा आणि टी20मध्ये 89 सामन्यात 2364 धावा केल्या आहेत.
भारताच्या या सर्वात यशस्वी महिला फलंदाजाबद्दल काही खास गोष्टी-
-मिताली राजचा जन्म 3 डिसेंबर 1982 साली जोधपुर, राजस्थानमध्ये झाला. तिचे वडील इंडियन एअर फोर्समध्ये ऑफिसर आहेत.
-मितालीला लहानपणी शास्त्रीय नृत्यामध्ये आवड होती. तिने भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे धडेही गिरवले होते. तिला यात कारकिर्दही घडवायची होती. पण नंतर ती क्रिकेटकडे वळाली.
-तसेच तिला नागरी सेवेतही (civil services) जाण्याची इच्छा होती.
-मिताली लहानपणी खूप आळशी असल्याने तिला शिस्त लागावी आणि तिच्यातील आळशीपणा जावा म्हणून क्रिकेट खेळाशी तिची ओळख करुन दिली. तिने एका मुलाखतीतही सांगितले होते की ती सुरुवातीला तिच्या पालकांना आनंदात बघण्यासाठी फक्त क्रिकेट खेळायची.
-मितालीचे वय 16 वर्षे 250 दिवस असताना तिचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. तिने आयर्लंड विरुद्ध 26 जून 1999 मध्ये पदार्पण करताना 114 धावांची शतकी खेळीही केली. ती त्यावेळी वनडे पदार्पणात शतकी खेळी करणारी सर्वात तरुण महिला क्रिकेटपटू ठरली होती.
-त्याचबरोबर तिचे 114 धावा या वनडे पदार्पणातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. वनडे पदार्पणात शतक करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली होती. तिने पदार्पण केलेल्या सामन्यातच तिच्याबरोबर रेश्मा गांधीनेही पदार्पण केले होते. तसेच रेश्मानेही शतक केले. पण रेश्माने मितालीच्या आधी शतक केल्याने ती वनडे पदार्पणात शतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
At just 19 years of age India's Mithali Raj struck 214 #OnThisDay in 2002 to soar into the record books! pic.twitter.com/KOrh7bEELr
— ICC (@ICC) August 17, 2016
-मितालीने आत्तापर्यंत 5 विश्वचषक खेळले असून यात तिने 54.23 च्या सरासरीने 1139 धावा केल्या आहेत.
🏏 3052 ODI runs at 51.72
🏏 1989 T20I runs at 36.83Mithali Raj, who celebrates her birthday today, was one of the most prolific batters during the #ICCAwards period 🙌
She is a nominee for the ICC Women's Player of the Decade award!
Vote 👉 https://t.co/Ib6lqGqUOi pic.twitter.com/WfElI7vOnb
— ICC (@ICC) December 3, 2020
-मिताली 21 वर्षे 4 दिवसाची असताना तिने पहिल्यांदा भारतीय महिला संघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे ती भारतीय महिला संघाची सर्वात तरुण कर्णधारही ठरली. तिने भारतीय महिला संघाचे सर्वाधिक वनडे सामन्यात नेतृत्व केले आहे. आत्तापर्यंत तिने 132 वनडे सामन्यात भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
-मितालीने खेळलेल्या 10 कसोटी सामन्यांपैकी तिसरा कसोटी सामना तिच्यासाठी खास ठरला. कारण तिने त्या सामन्यात द्विशतकी खेळी करतामा 214 धावा केल्या. 16 ऑगस्ट 2002 ला तिने ही खेळी केली होती.
तसेच ती त्यावेळी महिला कसोटी क्रिकेटमध्ये एका डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावांचाही विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला. त्यानंतर पाकिस्तानच्या किरण बलूचने 242 धावा करत मितालीचा हा विक्रम मो़डला.
-मिताली देशांतर्गत क्रिकेट रेल्वेकडून खेळते.
-वनडेमध्ये 5,500पेक्षा जास्त धावा करणारी ती दुसरीच महिला क्रिकेटपटू आहे. तसेच मिताली ही वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला फलंदाजही आहे.
-तिला 2003 मध्ये भारत सरकारकडून अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच त्यानंतर 2015 मध्ये तिचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार- पद्मश्री पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला.
-तसेच तिला 2015 मध्ये विस्डेनचा सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटूही ठरली.
महत्त्वाच्या बातम्या –
जडेजानंतर ‘या’ खेळाडूनेही मांजरेकरांना पाडले तोंडघशी; मागे घ्यावी लागली टीका
भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी असा आहे १८ जणांचा ऑस्ट्रेलिया संघ