मागील आठवड्यात बुधवारी (८ एप्रिल) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतासमोर एक प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत पैसे गोळा करण्यासाठी भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये ३ सामन्यांच्या वनडे मालिकेचा आयोजनाचा होता.
शोएबचा हा प्रस्ताव भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी फेटाळत म्हटले की, “भारताला पैशांची आवश्यकता नाही. तसेच क्रिकेट सामन्यासाठी जीव धोक्यात घालून काहीच फायदा नाही.”
त्यानंतर आता शोएबने (Shoaib Akhtar) भारतविरुद्ध पाकिस्तानमधील (India vs Pakistan) मालिकेबद्दल कपिल देव यांना उत्तर दिले आहे.
कपिल देव यांच्या वक्तव्यावर आजतकला दिलेल्या मुलाखतीत शोएब म्हणाला की, “मला वाटते की, कपिल भाईंना माझे म्हणणे समजले नाही. प्रत्येक जण आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत चालला आहे. ही वेळ एकत्र येऊन पैशांची व्यवस्था करण्याची आहे.”
शोएब पुढे म्हणाला की, “जगभरातील प्रेक्षकांना एका सामन्यासाठी प्रेरित केले जाईल. कपिल देव यांना पैशांची आवश्यकता नाही. परंतु इतर लोकांना आहे. मला वाटते की यावर लवकरच सल्लामसलत करण्यात येईल.”
शोएब यावेळी म्हणाला की, “कपिल देव (Kapil Dev) यांचा मी खूप आदर करतो. ते एक महान व्यक्ती आहेत. तसेच माझे अनुभवी सीनियर खेळाडू देखील आहेत. ते आपल्या पाहुण्यांची काळजी घेतात. मला भारतामध्ये खूप आदर मिळाला आहे. जर मी अशा देशाबद्दल विचार करतो, जिथे मला पाकिस्तान नंतर सर्वाधिक प्रेम मिळाले आहे. तर तो अर्थातच भारत आहे. परंतु मी सध्या मोठा विचार करत आहे.”
कोरोना व्हायरसने (Corona Virus) आतापर्यंत जवळपास १,१४, २१५ लाख लोकांचा जीव घेतला आहे. इतकेच नव्हे तर काही देशांनी आपापल्या देशाची सीमाबंदी केली आहे. तसेच जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धाही रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. याबरोबरच आयपीएल २०२०च्या १३व्या हंगामावरही कोरोना व्हायरसचे सावट पसरले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात कर्णधार असताना सर्वाधिक शतके करणारे ५ फलंदाज
-वनडेत सर्वाधिक शतके करणारे ५ कर्णधार, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी
-कसोटीत कर्णधार असताना सर्वाधिक शतके करणारे ५ खेळाडू