कुठलेही क्षेत्र असो तिकडे आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मग त्या आरोपांना कारण असो किंवा नसो. या सगळ्या गोष्टी आपणास क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. हल्लीच पाकिस्तान संघाचा माजी खेळाडू सईद अजमल याने भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाज आर अश्विनबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.
माजी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अजमलने भारतीय खेळाडू अश्विनवर आरोप केला आहे की, अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे (आईसीसी)च्या बंदीपासून वाचण्यासाठी क्रिकेटपासून काही काळ लांब राहिला.
एका यूट्यूब चॅनेलसोबत बोलताना अजमल म्हणाला की, “या लोकांनी स्वत:हून नियम बदलला होता. गेली कित्येक वर्ष मी क्रिकेट खेळत होतो. ते सगळे नियम जणू माझ्यासाठी बनवले गेले होते. त्यावेळेस अश्विनसुद्धा ६ महिन्यांपासून क्रिकेटच्या संपर्कात नव्हता. त्यावेळी त्याच्यावर का लक्ष दिले गेले नाही?. त्याला त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर काम करत यावे म्हणून त्यावेळी त्याचावर बंदी घालण्यात आली नाही. पण हेच पाकिस्तानी गोलंदाजावर बंदी घातली जाते आणि याचा कोणालाही कसलाही फरक पडत नाही. त्यांना केवळ पैश्यांशी घेणंदेणं आहे.”
काही काळापूर्वी अजमलवर त्याच्या गोलंदाजीच्या शैलीमुळे आईसीसीने बंदी घातली होती. त्यामुळे पुढे जाऊन अजमलची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपुष्टात आली. अजमलने २००८ साली पाकिस्तान संघासाठी पदार्पण केले आणि तेव्हापासूनच तो सतत गोलंदाजीच्या शैलीमुळे संघाच्या आत बाहेर होत राहिला. दुसरीकडे, अश्विनने २०१० साली भारतासाठी पदार्पण केले आणि अश्विन अजूनही संघात आपले स्थान कायम करून आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट’ फटका! गोलंदाजाच्या चेंडूवर कोहलीचा गगनचुंबी षटकार, सर्व खेळाडू पाहतचं राहिले
ठरलं तर! ‘हाच’ दिग्गज श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाचा महागुरु, गांगुलीचा शिक्कामोर्तब
पहिलीवहिली कसोटी चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह भारतीय संघ उतरणार मैदानावर!