शुक्रवारी(6 सप्टेंबर) भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना पार पडला. ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर पार पडलेल्या या सामन्यानंतर भारत अ संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने त्याची दोन सामन्यांची मॅच फी ग्राउंडस्टाफला समर्पित केली आहे.
या मालिकेत सातत्याने येत असलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतरही ग्राउंडस्टाफने सामना होण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानताना सॅमसनने मॅच फिची 1 लाख 50 हजार एवढी रक्कम ग्राउंडस्टाफला दिली आहे.
न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सॅमसन म्हणाला, ‘आपण ग्राउंडस्टाफला श्रेय द्यायला हवे. त्यांच्यामुळे आपण खेळू शकलो. जर मैदानात थोडासाही ओलावा असता तर सामनाधिकाऱ्यांनी सामना होऊ दिला नसता. आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यामुळे मी निर्णय घेतला आहे की माझी मॅच फि मी ग्राउंडस्टाफला देईल.’
शुक्रवारी भारत अ विरुद्ध दक्षिण आफ्रिका अ संघात झालेल्या 5 व्या सामन्यात भारताने 36 धावांनी विजय मिळवला. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे 20-20 षटकांचा करण्यात आला होता. सॅमसनला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार पुरस्कार मिळाला.
त्याने या सामन्यात 48 चेंडूत 6 चौकार आणि 7 षटकारांसह 91 धावांची खेळी केली. तसेच त्याने शिखर धवन बरोबर या सामन्यात दुसऱ्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारीही केली. शिखरने या सामन्यात 51 धावा केल्या. भारताने या विजयाबरोबरच 5 सामन्यांची ही वनडे मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–यूएस ओपन: १९ वर्षीय बियांका अँड्रेस्क्यूने सेरेनाला पराभूत करत मिळवले पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद
–असा होणार आहे पुढीलवर्षी महिला टी२० विश्वचषक, जाणून घ्या सर्वकाही…
–चौथ्या ऍशेस सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर झाले हे ३ नकोसे विक्रम