fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

असा होणार आहे पुढीलवर्षी महिला टी२० विश्वचषक, जाणून घ्या सर्वकाही…

पुढीलवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात आयसीसी महिली टी20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकाचा संपूर्ण कार्यक्रम आयसीसीने जाहिर केला आहे.

या विश्वचषकात एकूण 10 महिला संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये गतविजेता ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, बांगलादेश आणि थायलंड संघांचा समावेश आहे. यातील बांगलादेश आणि थायलंड संघांनी पात्रता फेरीतून मुख्य विश्वचषक स्पर्धेत प्रवेश केला आहे. तर अन्य 8 संघांना थेट प्रवेश मिळाला आहे.

या विश्वचषकातील साखळीफेरी 2 गटात होईल. अ गटामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश संघाचा समावेश आहे. तर ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान आणि थायलंड संघाचा समावेश आहे. थायलंड संघाचा हा पहिलाच विश्वचषक आहे.

ही स्पर्धा 21 फ्रेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणार असून एकूण 23 सामने या स्पर्धेत होणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान या स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने होतील. त्यानंतर दोन्ही गटातील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. दोन्ही उपांत्य सामने 5 मार्चला सिडनीमध्ये पार पडतील.

यानंतर 8 मार्चला अंतिम सामना मेलबर्नला होईल. 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

या स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारतीय महिला संघात 21 फेब्रुवारीला सिडनी येथे होईल.

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यानंतर साखळी फेरीत बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध अनुक्रमे 24 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीला सामने खेळेल.

2020 आयसीसी महिला टी20 विश्वचषकात असे होतील भारताचे सामने – 

साखळी फेरी –

21 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

24 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला (वेळ – दुपारी 4.30 वाजता)

27 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला (वेळ – सकाळी 8.30 वाजता)

29 फेब्रुवारी – भारतीय महिला विरुद्ध श्रीलंका महिला (वेळ – सकाळी 8.30 वाजता)

उपांत्य फेरी – 

5 मार्च – पहिला सामना -अ गटातील अव्वल क्रमांकचा संघ विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ (वेळ – सकाळी 8.30 वाजता)

5 मार्च – दुसरा सामना – ब गटातील अव्वल क्रमांकचा संघ विरुद्ध अ गटातील दुसऱ्या क्रमांकाचा संघ (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

अंतिम सामना – 

8 मार्च – उपांत्य सामना 1 मधील विजेता विरुद्ध उपांत्य सामना 2 मधील विजेता (वेळ – दुपारी 1.30 वाजता)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

चौथ्या ऍशेस सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर झाले हे ३ नकोसे विक्रम

या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरने विराट कोहली, अमलाला मागे टाकत रचला नवा इतिहास

You might also like