ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ तब्बल २४ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर (Australia tour of Pakistan 2022) आहे. ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तान संघासोबत ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी रावलपिंडी येथे खेळत आहे. या कसोटीत दोन्ही संघांनी मिळून ९०० धावा केल्या आहेत. या कसोटीच्या पाचव्या दिवशी सुद्धा निकाल लागला नाही. या कसोटीत डेविड वॉर्नरने (David Warner) मात्र पाकिस्तानी चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या विस्फोटक फलंदाजाने दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा चित्रपटातील हुक स्टेपची नक्कल करताना दिसला आहे. त्याने कधी ‘देसी ठुमका’ तर कधी ‘मै झुकेगा नही’ या स्टेपच्या नकला करत पाकिस्तानी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
Even after 160 overs in the field, @davidwarner31 is still entertaining the Rawalpindi crowd with a dance. That's why we love him as do the people of Pakistan. #PAKvAUSpic.twitter.com/XgG04hb2QH
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) March 5, 2022
सोशल मिडीयावर डेविड वाॅर्नरचे दोन व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाॅर्नर पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना पुष्पा चित्रपटातील ‘मैं झुकेगा नही’ हा डायलाॅग काॅपी करताना दिसला, तर दुसऱ्या व्हिडीओत तो रश्मिका मंधानाच्या सामी गाण्याप्रमाणे ठुमका लगावताना दिसला. त्याचे हे दोन्ही मजेशीर व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. तसेच तो सामन्यादरम्यान भांगडाही करताना दिसला आहे.
David Warner on different mood these days on & off the field. pic.twitter.com/7doImPxIP7
— Johns. (@CricCrazyJohns) March 8, 2022
तो क्रिकेट व्यतिरिक्त सोशल मिडीयावर देखील सतत सक्रिय असतो आणि तो त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असतो, त्याचे फोटो चाहत्यांना सुद्धा खुप आवडतात.
#AUSvsPAK#David Warner 🤣🤣 pic.twitter.com/KXntG3leTr
— Imran Ahmad Lone (@imranlone11) March 5, 2022
वाॅर्नरच्या अगोदर अनेक खेळाडूंनी पुष्पा गाण्यावर नक्कल केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मोहाली कसोटीमध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सुद्धा अल्लू अर्जुनची नकल करताना दिसला होता. रविंद्र जडेजाने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो अल्लू अर्जुनच्या पुष्पामधील लूकमध्ये दिसला होता. जडेजाने मोहाली कसोटीमध्ये शानदार कामगिरी केली आहे.
रावलपिंडी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाजी उस्मान ख्वाजाने ९७ मार्नस लाबुशेनने ९०, स्टीव स्मिथने ७८ आणि डेव्हिड वाॅर्नरच्या ६८ धावांच्या खेळीच्या मदतीने पहिल्या डावात ७ विकेट गमावत ४४९ धावा केल्या आहेत. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात ४ विकेच गमावत ४७६ धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या डावात पाकिस्तानपेक्षा २७ धावांनी मागे केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सीएसके संघात ‘या’ खेळाडूची एन्ट्री, आयर्लंड संघाचा गोलंदाज नेट बाॅलरच्या रुपात टीममध्ये दाखल
मुलाखतीदरम्यान भावुक झाला रोहित; म्हणाला, ‘स्वप्नातही वाटलं नव्हतं कसोटी संघाचे नेतृत्त्व करेल’
टीम इंडियात पुनरागमन करणार हार्दिक? एनसीएमध्ये दाखल होण्याचे मिळाले आदेश