इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) १५ वा हंगाम मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना २६ मार्चला खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आणि कोलकत्ता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) या संघांमध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. सीएसके संघ सध्या सूरतमध्ये आयपीएलचा सराव करत आहे. दरम्यान सीएसके संघात आयर्लंड संघाचा वेगवान गोलंदाज जोश लिटील (Ireland pacer Josh Little) याला नेट गोलंदाज म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसके संघ संपूर्ण हंगामात नेट सरावासाठी जोशचा वापर करणार आहे.
क्रिकेट आयर्लंडने ट्वीट करत जोश लिटील आणि सीएसकेला शुभेच्छा दिल्या आहेत. क्रिकेट आयर्लंडने म्हटल आहे की, ‘जोश लिटीलला शुभेच्छा, जो येणाऱ्या आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सीएसके संघासोबत खेळणार आहे. सीएसकेच्या नेट गोलंदाजांच्या रुपात शानदार अनुभव घे.’
बीसीसीआयने रविवारी आयपीएल २०२२ च्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. यंदाचा आयपीएल हंगाम ६५ दिवस चालणार आहे. यादरम्यान ७० लीग सामने तर ४ प्ले ऑफचे सामने खेळले जाणार आहेत. यावर्षी १० संघ खेळताना दिसणार आहेत. या आयपीएलचे सर्व सामने मुंबई आणि पुण्यामध्ये खेळले जाणार आहेत. पहिला सामना केकेआर आणि सीएसकेमध्ये तर दूसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये खेळला जाणार आहे.
२०२२ च्या आयपीएल हंगामादरम्यान १२ डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत, त्यांपैकी पहिला सामना दुपारी ३:३० ला सुरू होईल तर दुसरा सामना ७:३० ला सुरु होणार आहे. अंतिम सामना २२ मेला खेळला जाणार आहे. सीएसके संघ यावर्षी चेन्नईमध्ये नाही तर सूरतच्या लाल भाई कांट्रेक्टर स्टेडियममध्ये खेळताना दिसणार आहे. धोनीने हे स्टेडियम निवडण्याचे कारण तेथील माती हे सांगितले आहे. सूरतच्या मैदानाची माती आणि खेळपट्टी मुंबईच्या त्या मैदानांसारखी आहे, जेथे आयपीएलचे सामने खेळले जाणार आहेत. १३ मार्चला सीएसकेने आपल्या पहिल्या सराव सत्राचे आयोजन केले आहे.
आयपीएल २०२२ साठी सीएसके संघ: एमएस धोनी (कर्णधार), मोइन अली, ऋतुराज गायकवाड, रविंद्र जडेजा, अंबाती रायडू, ड्वेन ब्रावो, रॉबिन उथप्पा, दीपक चाहर, केएम आसिफ, तुषार देशपांडे, शिवम दूबे, महेश थीक्षाना, राजवर्धन हॅंगरगेकर, सिमरजीत सिंग, डेवोन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सेंटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापती, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, सी हरी निशांत, एन जगदीसन, क्रिस जॉर्डन, के भगत वर्मा.
महत्त्वाच्या बातम्या-
मुलाखतीदरम्यान भावुक झाला रोहित; म्हणाला, ‘स्वप्नातही वाटलं नव्हतं कसोटी संघाचे नेतृत्त्व करेल’
टीम इंडियात पुनरागमन करणार हार्दिक? एनसीएमध्ये दाखल होण्याचे मिळाले आदेश
रणजी ट्रॉफी २०२२ च्या बाद फेरीसाठी ‘हे’ संघ ठरले पात्र; महाराष्ट्राच्या पदरी निराशा






