भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा दुसरा आणि शेवटचा सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने २३८ धावांनी विजय मिळवला आणि श्रीलंका संघाल क्लीन स्वीप (२-०) दिला. शेवटच्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी श्रेयस अय्यर याचे योगदान महत्वाचे ठरले आणि यासाठी त्याला सामनावीरही निवडले गेले. एकंदरीत पाहता श्रीलंका संघाविरुद्ध टी-२० आणि कसोटी मालिकेत श्रेयसचे प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे.
श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका खेळण्यापूर्वी उभय संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. टी-२० मालिकेचा सर्वच्या सर्व सामने भारतानेच जिंकले आणि श्रीलंकेला क्लीन स्वीप मिळाला. यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याचे योगदान मोलाचे म्हणावे लागेल. टी२० मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात श्रेयसने केलेल्या प्रदर्शनासाठी त्याला सामनावीर निवडले होते. तसेच मालिका जिंकल्यानंतर मालिकावीरही श्रेयस अय्यरच ठरला होता.
कसोटी मालिकेतील त्याच्या प्रदर्शनाचा विचार केला पहिल्या सामन्यात तो अपेक्षित खेळी करू शकला नव्हता. परंतु, दुसऱ्या सामन्यात त्याने चांगली खेळी केली. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात श्रेयसने ९२, तर दुसऱ्या डावात ६७ धावा केल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यातील प्रदर्शनासाठी श्रेयसला एकदा सामनावीर पुरस्कार निवडले गेले. परंतु, तो मालिकावीर बनू शकला नाही.
यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला मालिकावीर निवडले गेले. पंतने पहिल्या कसोटी सामन्यात ९६ धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ३९ आणि दुसऱ्या डावात ५० धावा केल्या.
एकंतरित पाहता श्रीलंका संघासाठी हा भारत दौरा खूपच निराशाजन राहिला. कारण त्यांना या दौऱ्यात एकही विजय मिळवता आला नाही. टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंंका संघ ६२ धावांनी पराभूत झाला होता. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टी-२० सामन्यात त्यांचा संघ अनुक्रमे ७ विकेट्स आणि ६ विकेट्सने पराभूत झाला. त्यानंतर ४ मार्चपासून सुरू झालेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने २३८ धावांनी विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानावर धावलेल्या फॅन्सबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी केलीये कडक कारवाई
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बांग्लादेश संघ आला होता काळाच्या तोंडून बाहेर