fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

किंग कोहलीने गांगुलीचा ‘दादा’ विक्रम टाकला मागे, आता केवळ ‘कॅप्टनकूल’ धोनी आहे पुढे

पुणे। रविवारी(13 ऑक्टोबर) भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयमवरवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 1 डाव आणि 137 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयाबरोबरच विराट कोहलीच्या नावावर एक विक्रम झाला आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने 8व्यांदा कसोटीमध्ये एका डावाने विजय मिळवला आहे. त्यामुळे सर्वाधिक कसोटी सामन्यात एका डावाने विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत त्याने मोहम्मद अझरुद्दीन यांची बरोबरी केली आहे.

अझरुद्दीन यांनीही 8 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून एका डावाने विजय मिळवला होता. त्यामुळे आता अझरुद्दीन आणि विराट या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

या यादीत एमएस धोनी अव्वल क्रमांकावर असून त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 9 कसोटी सामन्यांत एका डावाने विजय मिळवला होता.

सर्वाधिक कसोटी सामन्यात एका डावाने विजय मिळवणारे भारतीय कर्णधार – 

9 – एमएस धोनी

8 – विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन

7 – सौरव गांगुली

2 – पॉली उम्रीगर, कपिल देव, राहुल द्रविड

You might also like