लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव 35.2 षटकात 107 धावांवर संपुष्टात आला आहे. या सामन्यात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने 5 विकेट्स घेतल्या.
या सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (10 आॅगस्ट) सामन्याला सुरुवात झाली. परंतू दुसऱ्या दिवशीही पावसाचा सातत्याने व्यत्यय येत होता.
जेव्हा अॅंडरसनने ५ विकेट्स घेतल्या तेव्हा भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज बनला. त्याने २४ सामन्यात २६.६७च्या जबरदस्त सरासरीने ९५ विकेट्स घेतल्या आहेत. यातील ६९ विकेट्स अॅंडरसनने इंग्लंडमध्ये तर २६ विकेट्स भारतात घेतल्या आहेत.
यापर्वी वेगवान गोलंदाजांमध्ये इम्रान खानने भारताविरुद्ध २३ सामन्यात ९४ विकेट्स घेतल्या होत्या.
भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा कारनामा मुथय्या मुरलीधरनने केला आहे. त्याने २२ कसोटीत १०५ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
१०५- मुथय्या मुरलीधरन, सामने- २२
९५- जेम्स अॅंडरसन, सामने- २४
९४- इम्रान खान, सामने- २३
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अर्जून तेंडुलकर करतोय लॉर्ड्सच्या ग्राउंडस्टाफला मदत, चाहत्यांनी केले जोरदार कौतूक
–जेम्स अॅंडरसनकडून कुंबळेच्या जंबो विक्रमाची बरोबरी
–लॉर्ड्सवरील आॅनर्स बोर्डवर स्थान मिळवण्यासाठी एवढी मोठी कामगिरी करावी लागते