भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारपासून (दि. 1 मार्च) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023मधील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. इंदोर येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल चर्चेचा विषय ठरला आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, खराब फॉर्ममधून जाणाऱ्या राहुलला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये जागा मिळेल की नाही? कारण, शेवटच्या दोन्ही कसोटी सामन्यातून राहुलला उपकर्णधारपदावरून हटवले गेले आहे. अशात आता कर्णधार रोहित शर्मा याने राहुलला उपकर्णधारपदावरून हटवण्यामागील कारण सांगितले आहे.
काय म्हणाला रोहित?
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील पहिल्या दोन कसोटीत केएल राहुल (KL Rahul) संघाचा उपकर्णधार होता. मात्र, त्याला चांगली कामगिरी करता आला नाही. यानंतर निवडकर्त्यांनी त्याला संघात कायम ठेवले, पण त्याच्याकडून उपकर्णधारपद हिसकावून घेतले. आता रोहित शर्मा (Rohit Sharma) याने यावर मौन सोडले आहे. तो म्हणाला की, “केएल राहुल याला उपकर्णधारपदावरून हटवले जाण्याचा काहीच अर्थ नाहीये. या गोष्टीला जास्त महत्त्व दिले नाही पाहिजे.”
रोहित शर्माच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे की, केएल राहुल याला वाईट काळात कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, तिसऱ्या कसोटीत राहुलच्या अंतिम अकरा खेळाडूंमधील स्थानाबाबत अजूनही प्रश्न कायम आहे. सराव सत्रादरम्यान प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी शुबमन गिल (Shubman Gill) याच्यासोबत खूप वेळ घालवला आहे. अशात म्हटले जात आहे की, शानदार फॉर्ममध्ये असलेल्या शुबमनला तिसऱ्या कसोटीत राहुलच्या जागी खेळवले जाऊ शकते.
Snapshots from #TeamIndia's training session here in Indore ahead of the third Test match against Australia.#INDvAUS pic.twitter.com/yLmoBLxfYG
— BCCI (@BCCI) February 28, 2023
दुसरीकडे, राहुलनंतर संघाला नवीन उपकर्णधारही मिळाला नाहीये. बीसीसीआयने संघाची घोषणा करत कुणालाही उपकर्णधार बनवले नव्हते. बीसीसीआयने स्पष्ट केले होते की, कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे उपकर्णधार निवडण्याचा अधिकार असेल. चेतेश्वर पुजारा, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे उपकर्णधारपदासाठी दावेदार असल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या कसोटीत या तिघांपैकी एकाला उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते. (cricketer kl rahul remove from vice captaincy doesn t mean anything captain rohit sharma said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पैसा वसूल सामना, पण आम्ही निराश…’, न्यूझीलंडविरुद्ध 1 धावेने पराभूत होताच कर्णधार स्टोक्सलाही झालं दु:ख
फक्त एका धावेने कसोटीत विजय? पाहा किती वेळा घडलाय ‘हा’ इतिहास