मुंबई । भारतीय महिला क्रिकेट संघाला दोन वेळा विश्वचषक जिंकण्यात अपयश आले. मिताली राजच्या नेतृत्वात भारताने 2017 वनडे विश्वचषक अंतिम सामन्यापर्यंत पोहचला होता. पण यजमान इंग्लंडकडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. एक वर्षानंतर वेस्ट इंडीजमधील टी20 विश्वचषक उपांत्य फेरीत संघाचा पराभव झाला. तसेच 2005 च्या वनडे विश्वचषकातही भारतीय महिला संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला होता.
दरम्यान भारतीय महिला वनडे क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज म्हणाली आहे की, “पुढच्या वर्षी विश्वचषक जिंकून आपण यशाच्या शिखरावर असताना निवृत्ती घेणार आहे.”
स्टार स्पोर्ट्सच्या तेलगू कार्यक्रमात मिताली म्हणाली, 2013 चा विश्वचषक भारतात झाला तेव्हा आम्ही सुपर- 6 मध्येही पोचलो नव्हतो. मी खूप दुःखी होते. मग विचार केला की मी 2017 च्या विश्वचषकात प्रयत्न करेन. मग मी विश्वचषकासाठी खूप मेहनत घेतली. एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून बराच होमवर्क केला. जेव्हा आम्ही अंतिम फेरी गाठली तेव्हा मला वाटले की अंतिम सामना जिंकून मी निवृत्त होईल. बरीच वर्षे खेळल्यानंतर मला विश्वविजेतेपदाची ट्रॉफी वगळता सर्व काही मिळाले. पुढच्या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये मी पुन्हा प्रयत्न करेन.”
37 वर्षीय मितालीने गेल्या वर्षी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. ती म्हणाली, “पाच वर्षांपूर्वी बीसीसीआयने महिला क्रिकेट आपल्या अधिपत्याखाली घ्यायला हवे होते. बीसीसीआयने 2006-07 मध्ये महिला क्रिकेटची जबाबदारी घेतली. जर पाच वर्षांपूर्वी घडले असते तर बरे झाले असते. त्यावेळी बरेच हुशार खेळाडू होते पण पैशांचा अभाव आणि खेळाद्वारे आर्थिक स्थैर्य नसल्यामुळे त्यांनी आणखी एक व्यवसाय निवडला.”
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे प्रशिक्षण होणार या देशात?
रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय
मुंबई इंडियन्स आर्धी आयपीएल तर लिलावातच जिंकते, माजी क्रिकेटरने केले गमतीशीर विधान
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम
लग्न न करताच वडील होणारे हे आहेत ४ क्रिकेटपटू
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले