जगभरातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजेच आयपीएलचे आयोजन यावर्षी यूएईमध्ये होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२०चे आयोजन भारताबाहेर करण्यात येत आहे. खरंतर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, तर यूएईमध्ये या व्हायरसची खूपच कमी प्रकरणे समोर आली आहेत. भारताबाहेर आयपीएलचे आयोजन करणे हे पहिल्यांदा घडत नाही. खरंतर २००९ साली आयपीएलचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते तसेच २०१४ साली भारतात लोकसभा निवडणुका असल्यामुळे आयपीएलच्या २० सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये केले होते.
चला तर मग जाणून घेऊया आयपीएल २०२०चे आयोजन करण्यासाठी यूएई हा कशाप्रकारे योग्य देश आहे आणि याठिकाणी खेळाडू कोरोना व्हायरसपासून कशाप्रकारे सुरक्षित राहू शकतात.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअम आहे आधुनिक
आयपीएल २०२०चे आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये केले जाणार आहे. हे जगातील सर्वाधिक आधुनिक स्टेडिअमपैकी एक स्टेडिअम आहे. याठिकाणी खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा आहे, ज्या कदाचितच जगातील कोणत्याही स्टेडिअममध्ये पहायला मिळतील. दुबई क्रिकेट स्टेडिअममध्ये ८ खेळपट्ट्या आहेत, त्यामुळे एकाच ठिकाणी आयपीएल २०२० च्या सर्व सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते. म्हणजेच कोरोना व्हायरसदरम्यान खेळाडूंना एका जागेवरून दुसऱ्या जागी जावे लागणार नाही आणि ते जैव-सुरक्षित वातावरणात सुरक्षित राहतील.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये दिवस- रात्र सामन्यांची मजाच वेगळी आहे. खरंतर या स्टेडिअममध्ये विशेष प्रकारच्या फ्लड लाईट्स वापरण्यात आल्या आहेत, ज्यांना ‘रिंग ऑफ फायर’ या नावाने ओळखले जाते. या स्टेडिअममध्ये एकूण ३५० फ्लड लाईट्स आहेत, जे स्टेडिअमच्या छतावर लावण्यात आल्या आहेत. म्हणजेच या स्टेडिअममध्ये इतर स्टेडिअमप्रमाणे खांबावर लाईट्स लावण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे हे मैदानात कोणतीही सावली पडत नाही.
खेळाडूंसाठी आहेत जबरदस्त सुविधा
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअम दुबई स्पोर्ट्स सिटीमध्ये बनविण्यात आले आहे, जिथे पंचतारांकित हॉटेल्सच्या सुविधाही उपलब्ध आहेत. तरीही आयपीएलच्या सर्वच्या सर्व ८ फ्रंचायझी संघाच्या खेळाडू आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफसाठी एकाच हॉटेलमध्ये राहणे सोपे होणार नाही. परंतु दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमकडे अनेक रिसॉर्ट आहेत, जिथे संघ राहू शकतात. इतकेच नव्हे तर खेळाडूंच्या सरावासाठी इथे आयसीसी अकादमीदेखील बनविण्यात आली आहे, जिथे ४ प्रकारच्या मातीची खेळपट्टी बनविली आहे. आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि ब्रेसबेन, इंग्लंड, पाकिस्तानमधील मातीने खेळपट्ट्या तयार केल्या आहेत.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये जबरदस्त ड्रेसिंग रूम बनविण्यात आले आहेत तसेच स्टेडिअमच्या आतमध्ये आईस बाथ, मसाज आणि फिजिओ टेबल्सच्या सुविधाही आहेत. स्टेडिअममध्ये जिम आणि स्विमिंग पूलच्या सुविधाही आहेत. परंतु कोरोना व्हायरसचा धोका पाहता या गोष्टींचा वापर खेळाडू करू शकणार नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या-
-रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार मिळणार की नाही? सेहवाग घेणार निर्णय
-मुंबई इंडियन्स आर्धी आयपीएल तर लिलावातच जिंकते, माजी क्रिकेटरने केले गमतीशीर विधान
-विमानतळावर लाऊंजच्या एका कोपऱ्यात बसून राहिला ‘हा’ खेळाडू, जाणून घ्या कारण..
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२० ठरु शकतो या ५ खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम
-कर्टिस कॅम्फर – आयर्लंड क्रिकेटचा भविष्यातील सितारा
-टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ८: …आणि कुसल परेराने क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी एक पान लिहिले