श्रीलंका संघाचा महान क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनच्या जीवनावर बायोपिक चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाचे नाव ‘800’ असे असून ट्रेलर 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. तसेच ट्रेलर भारतीय संघचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर मुंबईत प्रदर्शित करणार आहे. या चित्रपटात मुरलीधरनची भूमिका अभिनेता मधुर मित्तल करत आहे, ज्याने स्लमडॉग मिलेनियर या ऑस्कर विजेत्या चित्रपटात काम केले होते.
मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) चा चित्रपट 800 हा एमएस श्रीपाथी यांनी लिहिलेला आहे, तसेच याचे दिग्दर्शिन देखिल यांनीच केले केला आहे. हा चित्रपट 3 भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यात हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि तेलुगूचा समावेश आहे. ट्रेलर प्रदर्शितच्या निमित्ताने मुरलीधरनच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहिती दिली जाईल. रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या टीझरमध्ये मुरलीधरनच्या आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत.
या चित्रपटासाठी सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेते विजय सेतुपती मुरलीधरनची भूमिका साकारणार होते, पण नंतर विरोध झाल्याने त्यांनी आपले नाव मागे घेतले. मुरलीधरनने आपल्या कारकिर्दीत 13 वेळा सचिन तेंडुलकरला आपला बळी बनवले होते. तर मुरलीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताविरुद्धच खेळला होता. मुथय्या मुरलीधरनने 2005 मध्ये भारताच्या चेन्नई येथील रहिवासी मधिमलर राममूर्तीशी लग्न केले.
SACHIN TENDULKAR TO UNVEIL TRAILER OF MUTHIAH MURALIDARAN BIOPIC ‘800’… #SachinTendulkar will unveil the trailer of the #MuthiahMuralidaran biopic, titled 800 [#800TheMovie], on [Tuesday] 5 Sept 2023 at an event in #Mumbai.#MadhurrMittal – who won acclaim for his performance… pic.twitter.com/cwjIN1vAmY
— taran adarsh (@taran_adarsh) September 4, 2023
कसोटी क्रिकेटमध्ये 800 बळी घेणारा पहिला गोलंदाज
1992 मध्ये मुथय्या मुरलीधरनने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला. यानंतर मुरलीने 133 कसोटी सामन्यात 22.73 च्या सरासरीने 800 बळी घेतले. या कालावधीत मुरलीने 67 वेळा एका डावात 5 आणि 22 वेळा डावात 10 बळी घेण्याचा पराक्रम केला होता. याशिवाय 350 वनडे सामने खेळताना मुरलीधरनने 534 विकेट्स घेतल्या होत्या. (srin lanka player muralitharan biopic movie trailer on 5oct )
महत्वाच्या बातम्या-
Asia Cup 2023मधून मोठी बातमी! Super- 4 फेरीतील सामन्यांबद्दल घेतला ‘हा’ निर्णय, INDvPAK सामना होणार फिक्स
World Cup 2023: भारतीय संघात कुणाला मिळू शकते संधी अन् कुणाची होणार हाकालपट्टी? वाचा एका क्लिकवर