संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये बरेच बदल होतील. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या विश्वचषकात कर्णधार विराट कोहली व प्रशिक्षक रवी शास्त्री ही जोडी भारतीय संघासाठी अखेरच्या वेळी काम करताना दिसेल. विराटने या विश्वचषकानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, शास्त्री हे देखील आपला प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ वाढविण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे गेली चार वर्षे भारतीय क्रिकेट संघासाठी गुरु आणि सेनापती अशी भूमिका पार पाडणारी ही जोडगोळी विभक्त होईल.
चार वर्षात पाहिले जय-पराजय
रवी शास्त्री आणि विराट कोहली या जोडीने मागील चार वर्षात भारतीय संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. भारताने क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी करून दाखवली होती. भारतीय संघाने २०१८ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मालिका २-१ ने खिशात घातलेली. याव्यतिरिक्त दरवेळी भारतीय संघाची विदेशातील कामगिरी मागील कामगिरीपेक्षा उजवी ठरली. भारताने शास्त्री प्रशिक्षक असताना दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडमध्ये वनडे मालिका जिंकण्याची कामगिरी देखील केली.
दुसरीकडे, शास्त्री यांच्या मार्गदर्शनात व विराटच्या नेतृत्वात भारताने दोन आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेतला. २०१९ वनडे विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत पोहोचला. तर, २०२१ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम कधीच पोहोचलेल्या भारतीय संघाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आले. शास्त्री यांनी यापूर्वी देखील भारतीय संघासह संचालक म्हणून काम पाहिले होते. २०१४-२०१५ मध्ये ते भारतीय संघासोबत जोडले गेलेले. मात्र, २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ते भारताचे नियमित प्रशिक्षक बनले.
हे दिग्गज बनू शकतात प्रशिक्षक
शास्त्री यांच्यानंतर भारताचे पुढील प्रशिक्षक म्हणून दिग्गज फिरकीपटू व माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे यांची वर्णी लागू शकते. कुंबळे यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने भारतात आणि परदेशात दमदार कामगिरी केलेली. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात देखील भारताने त्यांच्याच मार्गदर्शनात मजल मारलेली. कुंबळे यांच्या व्यतिरिक्त दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हे देखील मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
डेथ ओव्हर्सचा बादशाह!! एक-दोन नव्हे तब्बल ५ हंगामात धोनीने केल्यात अंतिम षटकात सर्वाधिक धावा
वयाच्या छत्तीशीत कार्तिकचा धोनीची शैली अवगत करण्याचा प्रयत्न, कडक ‘हेलिकॉप्टर शॉट’चा व्हिडिओ सुपरहिट