भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये (टी २०, एकदिवसीय आणि कसोटी) संघासाठी महत्वाचा गोलंदाज आहे. त्याने मुंबई इंडियन्ससाठी २०१३ मध्ये पहिल्यांदा त्याच्या आयपीएलमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यावेळी तो भविष्यात भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाजाच्या रूपात भूमिका पार पाडेल असे खूप कमी लोकांना वाटत होते. अनेकांना विश्वास होता की तो केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगेली कामगिरी करू शकेल. मात्र, सध्याचे भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा पूर्ण विश्वास होता की तो भविष्यात कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करेल.
जसप्रीत बूमराहने त्याच्या टी २० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०१६ मध्ये पदार्पण केले होते. शास्त्रींना त्याच्या योग्यतेवर विश्वास होता आणि त्यांनी विराट कोहली आणि निवडकर्त्यांशी एक गोष्ट स्पष्ट केली होती की, बुमराहला २०१८ च्या दक्षिण अफ्रिका दौऱ्याच्या आधी जगासमोर आणू नये.
दरम्यान शास्त्रींनी द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत बुमराह कसोटी गोलंदाज बनेपर्यंतीचा घटनाक्रम सांगितला आहे. त्यांनी असे सांगितले की, कोणालाच वाटत नव्हते की, बुमराह कसोटी क्रिकेट खेळेल. तो मर्यादीत षटकांचा गोलंदाज आहे. मात्र, जेव्हा मी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली, तेव्हा मी स्वत:ला विचारले की, मी विदेशात २० विकेट्स कशा घेऊ शकतो? तेव्हा माझ्या डोक्यात बुमराहचे नाव आले होते.
शास्त्रींनी बुमराहला केपटाउन कसोटीसाठी जगापासून लपवून ठेवले
शास्त्रींनी पुढे सांगितले की, ‘मला माहित होते की मला चार गोलंदाजांची गरज आहे, कारण मी वेस्टइंडीजविरुद्ध खूप क्रिकेट खेळले आहे. याची सुरुवात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २०१८ मध्ये झाली होती आणि आपण ती आप्रतिम मालिका २-१ ने हरलो होतो. मी केपटाउनमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये बुमराहला समोर आणू इच्छित होतो. मी दक्षिण अफ्रिका दौरा सुरु होण्याच्या आधी विराट कोहली आणि निवडकर्त्यांशी चर्चा केली होती की, बुमराहला भारतात कसोटी क्रिकेट खेळवू नका. मला नाही वाटत की, केपटाउन कसोटी सामन्याच्या आधी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये जगाने पाहावे. ही गोष्ट तीन वर्षांपूर्वीची आहे. त्यानंतर बुमराहने २४ कसोटी सामन्यांमध्ये १०१ विकेट्स घेतल्या आहेत, जे अप्रतिम आहे.’
बुमराहने त्याच्या कोपटाउनमधील पहिल्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. त्या सामन्यात बुमराहने एबी डिव्हिलियर्सला बाद केले होते. त्यानंतर बुमराहने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने त्याच्या तीन वर्षाच्या कसोटी कारकिर्दीत शास्त्रीने केलेली भविष्यवाणी खरी करून दाखवली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. याच मालिकेदरम्याने तो कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात कमी सामन्यात १०० विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज ठरला. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये सलग दोन मालिकेत भारताच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती.
महत्त्याच्या बातम्या –
तब्बल चार वर्षानंतर तुटणार गुरू-शिष्याचं नातं, केली आहे संस्मरणीय कामगिरी
डेथ ओव्हर्सचा बादशाह!! एक-दोन नव्हे तब्बल ५ हंगामात धोनीने केल्यात अंतिम षटकात सर्वाधिक धावा





