पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ सामन्यांची वनडे मालिका पार पडणार होती. या मालिकेतील पहिला वनडे सामना १७ सप्टेंबर रोजी पार पडणार होता. परंतु सामना सुरू होण्याच्या दोन तासांपूर्वी न्यूझीलंड संघाने ही मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड सरकारने दिलेल्या आदेशानंतर न्यूझीलंड संघाने हा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी संताप व्यक्त केला आहे. तर क्रिकेट चाहत्यांनीही या निर्णयानंतर निराशा व्यक्त केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर एका क्रिकेट चाहत्याच्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रडताना दिसून येत आहे.
क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना मैदानावर खेळताना पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. हीच संधी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना देखील मिळाली होती. परंतु न्यूझीलंड संघाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. त्यातही एका क्रिकेट चाहत्याच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय, ज्यामध्ये तो रडताना आणि न्यूझीलंड संघाबद्दल भाष्य करताना दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याने म्हटले की, “यापेक्षा अजून वेगळा पाहुणचार कसा केला जातो? आम्ही पाकिस्तानी वेशभूषा केली आहे, पण न्यूझीलंडचा झेंडा हाती आहे. जर यावर पीसीबी आणि रमीज राजांचा लोगो नसता, तर नक्कीच झेंडा फाडला असता.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींचा आयसीसीवर पूर्ण विश्वास आहे की, ते न्यूझीलंड संघावर बंदी घालतील. जर आयसीसीने कारवाई केली नाही तर आम्हाला विश्वचषकावर बहिष्कार टाकावा लागेल. पाकिस्तान हा जगातील सर्वोत्तम संघ आहे. पाकिस्तानने जगाला दाखवले आहे की, क्रिकेट नक्की काय आहे?”(Viral Video of Pakistani fan after nz vs pak tour cancelled)
हा दौरा रद्द केल्यानंतर, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने विधान केले होते की, “पाकिस्तानमध्ये खेळाडूंना धोका आहे, ही माहिती न्यूझीलंड सरकारने दिल्यानंतर मालिका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मालिका पुढे सुरू राहणार नाही.” त्यानंतर माजी पाकिस्तानी कर्णधार रमिज राजा यांनी न्यूझीलंड क्रिकेटला चेतावणी देत, हा मुद्दा आयसीसीपर्यंत जाईल असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंड संघाची पाकिस्तानातून दुबईत सुखरुप लँडिग, ‘या’ दिवशी जाणार मायदेशी
वयाच्या छत्तीशीत कार्तिकचा धोनीची शैली अवगत करण्याचा प्रयत्न, कडक ‘हेलिकॉप्टर शॉट’चा व्हिडिओ सुपरहिट
आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचला होता इतिहास, पाहा तो क्षण






