येत्या डिसेंबर महिन्यात प्रो कबड्डी लीग स्पर्धेचा ८ वा हंगाम सुरू होणार आहे. कबड्डी चाहते ही स्पर्धा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी २९ ऑगस्ट पासून ते ३१ ऑगस्ट पर्यंत खेळाडूंचा लिलाव आयोजित करण्यात आला आहे. या लिलावाच्या दुसऱ्या दिवशी बंगाल वॉरियर्स संघाने अबोजर मोहजरमिघानीला आपल्या संघात स्थान दिले आहे.
प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या ८ व्या हंगामासाठी लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावातील पहिल्या दिवशी अवघ्या ४ खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. तर दुसऱ्या दिवशी (३० ऑगस्ट) फ्रेंचाइजीनी अनुभवी खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्यावर जोर दिला.
गेल्या हंगामात तेलुगू टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा इराणचा धाकड बचावपटू अबोजर मोहजरमिघानी यंदा बंगाल वॉरियर्स संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येणार आहे. त्याला बंगाल वॉरियर्स संघाने ३०.५० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले आहे.(Abozar mohajermighani sold to bengal warriors in pkl auction)
अशी राहिली आहे कामगिरी
अबोजर मोहजरमिघानीने गुजरात फॉर्चून जायंट्स संघातून प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या हंगामातच अवघ्या २४ सामन्यात ६६ पकडी केल्या होत्या. गुजरात संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर ६ व्या हंगामात त्याला तेलुगू टायटन्स संघाने ७६ लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. या हंगामात देखील त्याने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने या हंगामात एकूण ५६ पकडी केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
दीपक हुड्डाच्या किमतीवर चाहते नाराज, पीकेएल लिलावात केवळ ‘इतक्या’ लाखांची लागली बोली
बंगालचा वाघ आता खेळणार पायरेट्स संघासाठी, जँग कुन लीवर लागली ‘इतक्या’ लाखांची बोली