---Advertisement---

लॉर्ड्स कसोटी सामन्यात 2 भारतीय खेळाडूंना पदार्पणाची संधी, स्टार खेळाडूला अखेर संधी मिळणार?

On: मंगळवार, जुलै 8, 2025 10:06 PM
---Advertisement---

बर्मिंघम कसोटी सामना जरी टीम इंडियाने (Team india) जिंकला असला, तरी दोन खेळाडूंच्या कामगिरीमुळे कर्णधार शुबमन गिल (Shubman gill & Gautam gambhir) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अजिबात समाधानी नाहीत. या दोघांनी व्यवस्थापनाला खूप निराश केले आहे. त्यामुळे लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यात पुन्हा त्यांना संधी देणे म्हणजे मोठी चूक ठरू शकते. अशा वेळी दोन भारतीय खेळाडूंना तिसऱ्या सामन्यात कसोटी पदार्पणाची मोठी संधी मिळू शकते. या खेळाडूंमध्ये एकजण खूप दिवसांपासून संधीची वाट पाहत आहे.

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या दोन सामन्यात खेळलेला करुण नायर (Karun Nair) अजून ही आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे. आधी तो सहाव्या क्रमांकावर खेळला, तिथे अपयशी झाला, मग व्यवस्थापनाने त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळवले. मात्र, तिथेही तो फेल ठरला. त्यामुळे आता भारतीय संघ व्यवस्थापन मोठा बदल करू शकते. इंडिया ए संघाचे नेतृत्व करताना जबरदस्त खेळ केलेल्या अभिमन्यू ईश्वरनला (Abhimanyu Ishwarn) अखेर पदार्पणाची संधी मिळू शकते. ईश्वरन खूप काळापासून टीम इंडियाचा (Team india) भाग असला तरी अजून त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करता आलेले नाही. पण कदाचित लॉर्ड्सच्या मैदानावर त्याचे नशीब उजळू शकते.

लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी पाहिली तर ती हिरवळीने व्यापलेली दिसते. त्यामुळे 4 वेगवान गोलंदाजांना प्लेइंग 11 मध्ये जागा मिळू शकते. बर्मिंघम कसोटीमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाबतीत अपयशी ठरलेल्या नीतीश कुमार रेड्डीला (Nitish Kumar Reddy) बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. त्याच्या जागी स्विंग गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep singh ) संधी मिळण्याची शक्यता आहे. अर्शदीप खेळल्यास भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी आणखी मजबूत होईल. प्रसिद्ध कृष्णाच्या (Prasiddh Krishna) जागी जसप्रीत बुमराहचे (Jasprit Bumrah) पुनरागमनही जवळपास निश्चित मानले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---